दौंड पोलिसांनी गाठला सुतावरून स्वर्ग, अज्ञात मयतासह अज्ञात मारेकऱ्यांना महिन्यात केले जेरबंद,प्रभारी पो नि सचिन पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी


दौंड पोलिसांनी गाठला सुतावरून स्वर्ग, अज्ञात मयतासह अज्ञात मारेकऱ्यांना महिन्यात केले जेरबंद,प्रभारी पो नि सचिन पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : कोरोना या संसर्गाने सर्वत्र हाहाकार केला असताना दौंड पोलिस स्टेशनचे अधिकारी त्याच्या विळख्यात सापडल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी म्हणून आलेले पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी महिन्यापूर्वी सापडलेल्या अनोळखी तरुणाचा खून करून प्लास्टिक चिकट पट्टीने त्याचे हातपाय बांधून मृतदेह भीमा नदी  पात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,2 मार्च रोजी सदरची घटना उघडकीस आली होती,त्यानुसार दौंड पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी राहुल धस,प्रो पोलीस अधिकारी मयूर भुजबळ,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनस्थळाला भेट देऊन पुढील तपास सुरू केला होता,तपास सुरू असताना तीनही अधिकारी  पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या जागी प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारला आणि सदर तपास दौंड पोलीस स्टेशन डी बी पथकाद्वारे सुरू ठेवला,पोलिसांनी सदर मयताचे फोटो वर्तमानपत्र तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले परंतु कोणीही त्या तरुणाला ओळखत असल्याचे पुढे आले नाही त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सदर तरुणाच्या मृतदेहाचे फोटो चे फ्लेक्स तयार करून ठीकठिकाणी लावल्यानंतर त्याचा फायदा झाला आणि गणेगाव दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून 7 एप्रिल रोजी सप्नील लक्ष्मण निंबाळकर याचा दौंड पोलिस स्टेशनला फोन आला,पो नि सचिन पाटील यांनी त्या तरुणाला दौंड पोलीस स्टेशनला बोलावून त्या मृतदेहाचे फोटो आणि त्याच्या अंगावरील कपडे दाखवले असता त्याचा भाऊ प्रशांत उर्फ हर्षद लक्ष्मण निंबाळकर यांचा असल्याचे सांगितले, तो एक महिन्यापासून गायब असल्याचे त्याने सांगितले,पो नि सचिन पाटील त्याची माहिती विचारली असता,प्रशांत हा आमच्या गावातील मनोज उर्फ मारुती प्रकाश निंबाळकर यांचे बरोबर भुलेश्वर येथे दर्शनाला जातो म्हणून गेला होता,त्याचे बरोबर आणखी दोघेजण होते,सतीश काशिनाथ भोसले राहणार वरवं ड तालुका दौंड जिल्हा पुणे आणि सागर नवनाथ दाभाडे राहणार गणेगाव दुमाला तालुका शिरूर होते,ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पथक तयार केले, त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,सहायक फौजदार दिलीप भाकरे,पो हवा पांडुरंग थोरात,पो हवा असिफ पटेल,पो ना सचिन बोराडे,पो ना अण्णासाहेब देशमुख,पो ना किरण राऊत,पो कॉँ अमोल गवळी,अमोल देवकाते,नारायण वलेकर,आदेश राऊत,किरण डुके, रवि काळे यांचे पथक तयार करण्यात आले,आणि मनोज उर्फ मारुती निंबाळकर याला 10 एप्रिल रोजी गणेगाव दुमाला येथून ताब्यात घेतले,दुसरा आरोपी सतीश काशिनाथ भोसले याला भिगवन येथून ताब्यात घेतला आहे,एक आरोपी सागर नवनाथ दाभाडे हा फरार आहे, तीनही आरोपींवर दौंड, यवत,श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पो नि सचिन पाटील यांनी दिली आहे,मयताच्या जवळ कसलाही पुरावा नसतांना दौंड 

पोलिसांनी सुतवरून स्वर्ग गाठला आहे तपास यंत्रणा फिरवून मयताचे नाव निष्पन्न करून त्याचे मारेकरी शोधले आहेत,ही कौतुकासपद कामगिरी आहे,पो नि सचिन पाटील आणि त्यांच्या टीमचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस प्रोबेशनरी अधिकारी मयूर भुजबळ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या सहकार्यानी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News