कुकडीचे आवर्तन दि.२० एप्रिल रोजी सोडा अन्यथा जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणास बसणार - राजेंद्र म्हस्के


कुकडीचे आवर्तन दि.२० एप्रिल रोजी सोडा अन्यथा जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणास बसणार - राजेंद्र म्हस्के

श्रीगोंदा प्रतिनिधी: अंकुश तुपे

श्रीगोंदा तालुक्यातील पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष शेतकरी नेते, राजेंद्र म्हस्के यांनी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन पाठवले आहे.त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे,

दि.२०एप्रिल पर्यंत तातडीने कॅनॉलद्वारे पाणी सोडणे आवश्यक असून ते तातडीने सोडले तर उभी पिके व फळबागा वाचू शकतात अन्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे. दिनांक ९ एप्रिल रोजी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये असा निर्णय होईल असे अपेक्षित होते, परंतु पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधीने पिंपळगाव जोग्याचा रोटेशनचा विषय पुढे करून अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी हा निर्णय होऊ दिला नाही.

 तरी दि.९ एप्रिलच्या बैठकीमध्ये पिंपळगाव जोग्याचे रोटेशन संपल्यानंतर म्हणजेच मे महिन्यामध्ये अंदाजे दिनांक १० तारखेला कुकडीचे रोटेशन सुरू होऊ शकते,अशा बातम्या नगर जिल्ह्यातील सल्लागार समिती सदस्यांनी वर्तमानपत्राच्या व फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित केल्या. तरी हा निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न काही अधिकारी व लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक करत आहे असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून देतो की,कुकडीचे रोटेशन सुरू करण्यासाठी पिंपळगाव जोगा धरणातून जुन्नर व पारनेर तालुक्यासाठी सुरू असलेले शेतीचे आवर्तन संपण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. कारण पण त्या अगोदर आपले आवर्तन सुरू झालं म्हणजे दिनांक २० एप्रिल रोजी आपण आवर्तन सुरू करू शकता. माणिकडोह,डिंबा व इतर धरणातील पाणीसाठा एकत्र करून कुकडी कालवा २० दिवस चालेल तोपर्यंत म्हणजेच  दि. २ मे पर्यंत पिंपळगाव जोग्याचे लोकेशन संपुन जाते.मग आपल्याला पिंपळगाव जोगा धरणातून मृत साठ्यातील २ टीएमसी पाणी नदीद्वारे डायरेक्ट येडगाव धरणामध्ये येवू शकते.दिनांक २० एप्रिल रोजी सुरू केलेले रोटेशन खंडीत न होता सुरळीत पणे चालू शकते.यासाठी आवश्यकता आहे ती अधिकारी वर्गाच्या मानसिकतेची कारण पिंपळगाव जोगा वगळता कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांचे पाणी या ८ दिवसात एकत्रित करणे गरजेचे आहे.

 कुकडी कालव्याद्वारे दि.२० एप्रिलला पाणी सोडण्यात यावे, ही नगर जिल्ह्याच्या वतीने कळकळीची आग्रहाची विनंती करत आहोत. अन्यथा आपल्या विरोधात इच्छा नसताना देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या घरासमोर दि.२१ एप्रिल पासून आमरण उपोषणास बसावे लागेल. घरी बसण्यापेक्षा भविष्यात उपासमारी होण्यापेक्षा आत्ताच आपल्यासमोर शेतकऱ्यांना घेऊन उपोषणास बसत आहोत पुन्हा एकदा आपणास विनंती करत आहोत की, ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नये. आपण राज्यातील चार प्रमुख नेत्यांपैकी एक आहात.मंत्रीमहोदय आपले विधानसभेतील काम व आपला राजकीय प्रवास आम्ही पाहिला व अनुभवला आहे. नक्कीच आपण आमच्या मागणीचा विचार करून कुकडी लाभधारक शेतकऱ्यांना न्याय देताल अशी अपेक्षा बाळगतो.असे म्हस्केंनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News