सहजपूर येथील बंद असलेला डी.पी. लवकरात लवकर बसविण्यात यावा : दौंड तालुका ग्राहक कल्याण फौंडेशन


सहजपूर येथील बंद असलेला डी.पी. लवकरात लवकर बसविण्यात यावा : दौंड तालुका ग्राहक कल्याण फौंडेशन

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील सहजपूर येथील नामदेव जगतात यांच्या येथील डी. पी .महिन्याभरापासून बंद आहे, तरी मा. कार्यकारी अभियंता M S E B केडगाव विभागाकडे दौंड तालुका ग्राहक कल्याणफौंडेशन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही आज तागायत ती बसविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जळून चाललेली आहेत.जनावरांचा  पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे .अशी बिकट परिस्थिती झालेली आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्या कारणाने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे.डी. पी. बंद असल्याने पिण्याच्या पाण्यामुळे जर शेतकरीवर्ग आणि पिकांचे नुकसान झाल्यास व जनावरांचा जीव धोक्यात येत असेल तर याला प्रशासन जबाबदार आहे.

तरी आपण मनस्थितीचा गंभीरतापूर्वक सकारात्मक विचार करून बंद असलेला डी.पी.लवकरात लवकर बसविण्यात यावा अशी विनंती शेतकरीवर्ग आणि दौंड तालुका ग्राहक कल्याण फौंडेशन यांच्या वतीने M S E B विभागाकडे देण्यात आले आहे.यावेळी दौंड तालुका ग्राहक कल्याण फौंडेशनचे अध्यक्ष श्री अनिल बापू नेवसे, उपाध्यक्ष सौ.सविता विजय सोनवणे,सचिव दिगंबर भागूजी नेवसे,कडेठाणचे अध्यक्ष अमोल बाळासाहेब दिवेकर,आणि बोरीपार्धीचे अध्यक्ष राहुल मोहन पवार उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News