लसीकरणाने ओलांडला 9.80 कोटी मात्रांचा टप्पा. गेल्या चोवीस तासात 34 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


लसीकरणाने ओलांडला 9.80 कोटी मात्रांचा टप्पा. गेल्या चोवीस तासात 34 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

दररोज अधिकतम मात्रा देणाची सरासरी भारताने राखली कायम

रोज नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 10 राज्यात सर्वाधिक

देशातल्या एकूण सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्ह्यातले

देशभरात आजपर्यंत कोविड19 प्रतिबंधक लसीच्या 9.80 कोटी पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

उपलब्ध अहवालानुसार एकूण 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 लसीच्या मात्रा 14,75,410 सत्रांतून आज सकाळी सात वाजेपर्यंत देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत 89,88,373 आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर 54,79,821 आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीवर कार्यरत 98,67,330 कर्मचाऱ्यांना (पहिली मात्रा)तर आघाडीवर कार्यरत 46,59,035 कर्मचाऱ्यांना (दुसरी मात्रा) देण्यात आलीसाठ वर्षांवरील 3,86,53,105 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 15,90,388 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. तरपंचेचाळीस ते साठ वर्षांमधील 2,82,55,044 लाभार्थ्यांना (पहिली मात्रा) आणि 5,82,064 लाभार्थ्यांना (दुसरी मात्रा) देण्यात आली आहे.

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

89,88,373

54,79,821

98,67,330

46,59,035

2,82,55,044

5,82,064

3,86,53,105

15,90,388

9,80,75,160

देशात आतापर्यंत झालेल्या लसीकरणापैकी 60.62% लसीकरण आठ राज्यांमधे झाले आहे.

गेल्या 24 तासात 34 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाच्या 84 व्या दिवशी (9 एप्रिल2021)लसीच्या 34,15,055 मात्रा देण्यात आल्या. यापैकी 30,06,037 लाभार्थ्यांना 46,207 सत्रांमधे पहिली तर 4,09,018 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

Date: 9th April,2021

HCWs

FLWs

45 to <60 years

Over 60 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

11,975

29,051

53,152

1,11,697

19,79,517

54,504

9,61,393

2,13,766

30,06,037

4,09,018

जगभरात दररोज होत असलेल्या लसीकरणाचा विचार करता भारताने त्यात आपली आघाडी कायम ठेवली आहे.

दिवसाला सरासरी 38,93,288 मात्रा देत भारत अव्वल स्थानी आहे.

भारतात रोज नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात 1,45,384 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रछत्तीसगडउत्तर प्रदेशदिल्लीकर्नाटकतामिळनाडूकेरळमध्य प्रदेशगुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ नोंदवली जात आहे. एकूण नव्या रुग्णांपैकी 82.82% रुग्ण या दहा राज्यातील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन 58,993 नवे रुग्ण आढळले आहेत. छत्तीसगडमधे 11,447 तर उत्तर प्रदेशात 9,587 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 भारतात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 10,46,631 वर पोहचली आहे. हे प्रमाण देशातील एकूण रुग्णांच्या प्रमाणात 7.93% आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रीय रुग्णांमधे 67,023 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 72.23% रुग्ण महाराष्ट्रछत्तीसगडकर्नाटकउत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यातले आहेत. देशातील एकून सक्रीय रुग्णांपैकी 51.23% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्यात आहेत.

भारतात आज 1,19,90,859 जण कोरोनामुक्त झाले. देशाचा कोरोनामुक्तीचा दर 90.80 % वर पोहचला आहे.

गेल्या 24 तासात देशात 77,567 जण कोरोनामुक्त झाले.

दैनंदिन मृत्यूसंख्येत वाढ होत असून गेल्या 24 तासात 794 मृत्यूची नोंद झाली.

नवीन मृत्यूंपैकी 86.78% मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 301 तर छत्तीसगडमधे 91 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 12 राज्य/केन्द्र शासित प्रदेशात कोविड19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. यात पुद्दुचेरी, लद्दाख (केंप्र)दिव-दमण आणि दादरा- नगरहवेलीनागालँडत्रिपुरामेघालयसिक्कीममिझोरममणिपूरलक्षद्वीपआंदमान-निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News