"होमिओपॅथी - एकीकृत उपचार पद्धतीचा मार्ग" या विषयावरील दोन दिवसीय अधिवेशनाचे आज उद्‌घाटन


"होमिओपॅथी - एकीकृत उपचार पद्धतीचा मार्ग" या विषयावरील दोन दिवसीय अधिवेशनाचे आज उद्‌घाटन

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021

"होमिओपॅथी - एकीकृत उपचार पद्धतीचा मार्ग" या विषयावरील दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्‌घाटन आज नवी दिल्ली इथे झाले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री श्री श्रीपाद येसो नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यासाठी आयुष मंत्रालया अंतर्गत स्वायत्त शिखर संशोधन संस्था, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (सीसीआरएच) यांनी हे अधिवेशन आयोजित केले होते.

जागतिक होमिओपॅथी दिन (डब्ल्यूएचडी) होमिओपॅथीचे जनक डॉ. ख्रिस्ट्रियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅन्नेमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

 या मेळाव्यास ऑनलाईन संबोधित करतांना श्री श्रीपाद नाईक यांनी महामारीवर नियंत्रण ठेवण्यात होमिओपॅथीचे योगदान अधोरेखित केले. 

 कोविड महामारीच्या काळात, सरकारच्या सहकार्याने होमिओपॅथी उपचार पद्धतीचा झालेला लक्षवेधी लाभ परिषदेच्या कामांतून दिसून आला असे ते म्हणाले. आयुष मंत्रालयाने आयुष उपचार पद्धतींच्या संशोधन प्रस्तावांचे सातत्याने स्वागतच केले, होमिओपॅथी समुदायाने त्याला उत्तम प्रतिसाद दिला, त्यापैकी काहींना कृती दल समिती आणि भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) मान्यता मिळाली.

 उपचार पद्धतींच्या एकत्रीकरणाचा मंत्र अशा प्रकारे काळाच्या कसोटीवर उतरला आणि सीसीआरएचने संमेलनासाठी ही संकल्पना निवडल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सीसीआरएचने, होमिओपॅथिक क्लिनिकल केस रेपॉजिटरी (एचसीसीआर) पोर्टलचा एक अनोखा डिजिटल उपक्रम सुरु केला आहे.  यासाठीच्या पूर्वनिर्धारित मानक टेम्पलेट सुविधेचे लोकार्पण मंत्री महोदयांनी आज केले.

होमिओपॅथीच्या एकीकृत सेवा क्षेत्रात प्रभावी आणि कार्यक्षम समावेशासाठी धोरणात्मक उपाययोजना निश्चित करण्यासाठी धोरणकर्ते आणि तज्ञांच्या अनुभवाची देवाणघेवाण करणे हा या अधिवेशनाचा उद्देश आहे. 

द्‌घाटनादरम्यान, सीसीआरएचने होमिओपॅथीक क्लिनिकल केस रिपॉझिटरीची सुरुवात केली. देशभरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी उपचार केलेल्या प्रकरणांची माहिती इथे संकलित केली जाईल. त्यामुळे या उपचार पद्धतीच्या यशस्वीतेबद्दल भक्कम पुरावा उपलब्ध होईल. यावेळी सीसीआरएचचे ई-ग्रंथालय देखील सुरू करण्यात आले. उपचार पद्धतीचा प्रत्यक्ष उपयोग आणि शिक्षण, संशोधन यांची सीसीआरएचची भाषांतरीत प्रकाशनेही यावेळी प्रसिद्ध करण्यात आली.

 उद्‌घाटन सोहळ्यानंतर, एकीकृत उपचार पद्धती क्षेत्रात, होमियोपॅथी उपचार पद्धती तोंड देत असलेल्या आव्हानांवर कशी मात करता येईल, नव्या संधी कशा निर्माण करता येतील यावर धोरणकर्ते आणि तज्ञांची गटचर्चा झाली. श्री. रोशन जग्गी, डॉ. अनिल खुराना, डॉ राज के मनचंदा, आणि डॉ एमएल ढवळे यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.

 डॉ. मायकेल फ्रास, प्रोफेसर मेडिसिन, इंटर्नल मेडिसिन इन स्पेशलिस्ट, इंटर्नल इंटेंसीव्ह केअर मेडिसिन, व्हिएन्ना आणि डॉ. टू का लून आरोन, अध्यक्ष, एचके असोसिएशन ऑफ होमिओपॅथी, हाँगकाँग या अधिवेशनात डिजिटली सामील होणार आहेत. एकीकृत उपचार पद्धतीबाबतचे विचार ते मांडतील.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News