कर्जत शहरासह तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा - नामदेव राऊत


कर्जत शहरासह  तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा - नामदेव राऊत

कर्जत प्रतिनिधी - कर्जत शहरातील व तालुक्यातील कोरोनाची वाढती संख्या ही कर्जत मधील नागरिकांच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब असल्याची माहिती कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राउत यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना नामदेव राऊत म्हणाले की कर्जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची दुसऱ्या लाटेची परिस्थिती महाभयंकर होत चालली आहे.  कर्जत शहरात व तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत यावरती प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राऊत यांनी केली. ते म्हणाले की कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कर्जत मध्ये ज्या पद्धतीने कर्जत नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, व सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी, अधिकारी व नगरपंचायतचे कर्मचारी यांनी ज्या प्रकारे मागच्या वर्षी नियोजन केले होते त्याच प्रकारचे नियोजन जर या दुसऱ्या लाटे साठी केले तर कोरोनाची रुग्णसंख्या संख्या आटोक्यात आणता येऊ शकते. असे मत त्यांनी व्यक्त केले राऊत म्हणाले की गेल्या वर्षी कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींचा शोध नगरपंचायत व आरोग्य कर्मचारी घेत होते व त्यांची पूर्ण चाचणी करून घेत होते तसेच कोरणा पॉझिटिव व्यक्ती ज्या भागात राहत होते त्या भागातील नागरिकांना कोरणा चाचणी करण्यासाठी जनजागृती मोहिमेअंतर्गत जागृत करून तपासणी करून घेण्यात येत होत्या. तसेच मागच्यावेळी अत्यावश्यक दुकानांसमोर लोकांच्या सुरक्षेसाठी दोन दोन मीटर अंतरावर वर्तुळ आखण्यात आले होते तसेच वर्तुळ आत्ताही अत्यावश्यक दुकानांसमोर आखण्यात यावेत अशी मागणी राऊत यांनी केली. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णांचे घर व त्या भागातील आसपासचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा तसेच रस्त्यावरती कोरोनाच्या रोगाबाबत जनजागृतीपर भित्तीपत्रके काढावीत. तसेच शहरांमध्ये विना मास फीरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वेगवेगळे पाच पथके तयार करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच कर्जत शहरातील शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, बँका, दवाखाने यांच्यासमोर पूर्वीप्रमाणेच हात धुण्यासाठी हॅंड वाशचे स्टेशन  कार्यान्वित करण्यात यावेत तसेच अनेक लोक मेडिकल, किराणा, दवाखाने किंवा बँक इत्यादी कारणे सांगून शहरात विनाकारण फिरत असतात म्हणून अत्यावश्यक मध्ये असणारी दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत सुरू ठेवण्यात यावेत व शहरातील सर्व मेडिकल दुकाने सुद्धा सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत सुरू ठेवावीत व रोज दोन वेगवेगळे मेडिकल्स अत्यावश्यक रुग्णासाठी सुरू ठेवण्यात यावीत अशी मागणी यावेळी राऊत यांनी केली. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना ही दिवसातील काही ठराविक वेळ कडक निर्बंध आखून  उघडण्याची परमिशन प्रशासनाने द्यावी अशीही मागणी नामदेव राऊत यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केली.यावेळी विनोद दळवी, अमृत काळदाते, अनिल गदादे, रामदास हजारे, मासाळ आदी उपस्थित होते. 

 कर्जत शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही स्वयंसेवक म्हणून रस्त्यावर उतरून काम करण्यास तयार आहोत परंतु नगरपंचायत आणि आरोग्य विभागाने जर आम्हाला त्यांचे कर्मचारी मदतीला दिले तर आम्ही कर्जत नगरपंचायत हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रभाव नक्कीच पंधरा दिवसांत कमी करुन दाखऊ - नामदेव राऊत 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News