बारामती तहसीलदारांची तालुक्यातील दुकानदारांवर कारवाई


बारामती तहसीलदारांची तालुक्यातील दुकानदारांवर कारवाई

बारामती : प्रतिनिधी   (काशिनाथ पिंगळे)

 कोविड १९ या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासन आदेश व सूचनांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. 

  बारामती तालुक्यात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन केल्याबद्दल बारामतीत तालुक्यातील अनेक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये किराणा माल, सायकल दुकान व इतर गर्दी झालेल्या आस्थापनावर बारामतीचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील यांनी पुढील सात दिवसांसाठी काही दुकाने सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत.

     पळशी येथील हनुमंत बापूराव धायगुडे यांच्या गणेश किराणा स्टोअर्स या दुकानात  पाचपेक्षा अधिक लोकांची गर्दी करून भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या कायद्यातील तरतुदी व आदेशाचा भंग केले असल्याचे आमच्या निदर्शनास आणून दिले आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून तशी खात्री झाल्यानंतर सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची सूचना ग्रामसेवक पळशी यांना दिल्यानंतर सदर अस्थापना  करण्यात आली. 

  सात दिवस सदर अस्थापना बंद राहतील याची खात्री करून सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.    यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे  सहाय्यक फौजदार बी. एल. खोमणे, होमगार्ड समीर तावरे, ग्रामसेविका दीपाली हिरवे, सरपंच बाबासाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळेकर, हनुमंत धायगुडे, पप्पू धायगुडे, बाळू बंडगर इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News