वनधन विकास योजना - भारतभरातील आदिवासींच्या सक्षमीकरणाची योजना


वनधन विकास योजना - भारतभरातील आदिवासींच्या सक्षमीकरणाची योजना

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील शहापूर येथील आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या आदिवासी नवोद्योजकांची यशोगाथा

वन धन आदिवासी नवोद्योग कार्यक्रमाची अजून एक यशोगाथा. "गौण वन उपज उत्पादनांसाठी हमीभावाने विक्री व्यवस्था आणि अश्या उत्पादनांसाची मुल्यशृंखला विकसित करणे" या कार्यक्रमाचा भाग असलेल्या  या योजनेअंतर्गत स्थानिक आदिवासींना रोजगाराचा प्रमुख स्रोत उपलब्ध करून देणारी ही वनधन विकास केंद्र- आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था, शहापुरची यशोगाथा.

वनधन विकास केंद्रे ही आदिवासी नवोद्योजकतेचे उत्कृष्ट उदाहरण, तसेच त्यात सहभागी होणाऱ्यांना क्षेत्रीय विकास आणि मूल्यवर्धनातून जास्त उत्तम उत्पन्न कसे कमावता येते याचे प्रात्यक्षिक आहे.पश्चिम घाटातील पर्वतराजीने वेढला गेलेला शहापूर हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका.  इथल्या वनधन विकास केंद्रात सदस्य असलेले बहुसंख्य आदिवासी कातकरी समुदायातील आहेत. कातकरी ही महाराष्ट्रातील पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तसेच गुजराथमधील काही भागांमध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे. हे आदिवासी प्रामुख्याने शेतमजुरीची कामे करतात त्याचप्रमाणे जळणासाठीचा लाकूडफाटा आणि काही जंगली फळांची विक्रीही करतात.

या समुदायातील सुनील पावरा या नवउद्योजक सदस्य आणि त्याच्या मित्रांनी स्थानिक बाजारात गुळवेलीची विक्री सुरू केली.  आता वनधन योजनेंतर्गत वन धन विकास केंद्राचे 300 सदस्य झाले आहेत. या वनधन विक्री केंद्रातून आता अनेक मोठे उपक्रम चालवले जातात तसेच गुळवेल पावडरसह  35 हून अधिक उत्पादनांची व प्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री होते.गुळवेल पावडर बनवण्याच्या या प्रक्रियेत आदिवासीकडून झाडावरून गुळवेल तोडून घेतली जाते. त्यानंतर आठ ते दहा दिवस ती सुकवली जाते.  ही सुकवलेली गुळवेल शहापूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणून दळून घेतली जाते. नंतर त्याची पाकिटे बनवून, शिक्के मारून ती ट्राईब्ज इंडियासह इतर अनेक दुकानांच्या माध्यमातून  खरेदीदारांना विकली  जाते. गेल्या दीड वर्षात या गटाने 12, 40,000/-  (बारा लाख चाळीस हजार) रुपये किमतीची   गुळवेल पावडर, Rs.6,10,000/-( सहा लाख दहा हजार) रुपये मूल्याची   कच्ची गुळवेल अशी एकूण 18,50,000/ (अठरा लाख पन्नास हजार) रुपयांची विक्री केली आहे.

गेल्या दीड वर्षात समूहाने हे काम करत वनधन विकास केंद्रामार्फत डाबर, बैद्यनाथ, हिमालय, विठोबा, शारंगधर, भूमी नॅचरल प्रोडक्ट्स, केरळा त्रिविक्रम आणि मैत्री फुड्स यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना गुळवेल विक्री केली आहे. हिमालय आणि भूमी यासारख्या अनेक कंपन्यांनी यंदा साडेचारशे  टनांच्या  1, 57, 00,000/-  (एक कोटी सत्तावन्न लाख) रुपयांच्या गुळवेल पुरवण्याच्या  ऑर्डर्स दिल्या आहेत.

मार्च 2020 ते 2020 जूनचा मध्य या कालावधीत वनधन विकास केंद्र शहापूरने स्थानिक आदिवासींकडून 34,000 किलोग्रॅम हून अधिक गुळवेल खरेदी केली.

वनधन विकास केंद्राची ओळख बनलेल्या कच्चा किंवा प्रक्रिया केलेल्या गुळवेलीसोबतच केंद्राची व्याप्ती आता सफेद मुसळी,जांभूळ,बेहडा, वावडिंग, शेवगा, कडूनिंब, आवळा आणि संत्रा पावडर ह्या इतर उत्पादनांपर्यंत वाढली आहे.

या यशामुळे समुदायातील हजारो लोकांना प्रेरणा मिळत आहे तसेच आजूबाजूच्या भागातील इतर स्थानिक एकत्र येऊन याच प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशनने (TRIFED) 12,000 लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त 39 वनधन विकास केंद्रे मंजूर केली आहेत.

वनधन आदिवासी नवोद्योजक कार्यक्रम आदिवासींना आर्थिक भांडवल,प्रशिक्षण, आणि मार्गदर्शन  या स्वरुपात सहकार्य करून त्यांना सक्षम बनवणारा कार्यक्रम आहे. जेणेकरून ते त्यांचा उद्योग आणि त्याद्वारे त्यांची  मिळकत वाढवू शकतील.

आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत भारताला स्वनिर्भर बनवण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशनच्या (TRIFED) पुढाकाराने राबवलेल्या या वनधन केंद्रांची यशोगाथा ही गो व्होकल फॉर लोकल या सह मेरा वन मेरा धन मेरा उद्यम या सूत्रांनी देशाच्या आदिवासी अर्थव्यवस्थेच केलेल्या संपूर्ण बदलाचे उदाहरण आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News