राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याद्वारे शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी योजना "SARTHAQ" सार्थक चा आरंभ

"सार्थक" ही परस्परसंवादी, लवचिक आणि सर्वसमावेशक योजना : निशंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीसाठी नवी दिल्लीत आज केंद्रीय शैक्षणिक शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. उच्च शिक्षण सचिव अमित खरे शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 

ही योजना शालेय शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनवादी सुधारणांचा मार्गदर्शक म्हणून पाहिली जावी अशी सूचना पोखरियाल यांनी यावेळी केली.  धोरणाप्रमाणेच ही योजनाही परस्परसंवादी, लवचिक आणि सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी नमूद केले.

29 जुलै 2020 रोजी जारी झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे लक्ष्य आणि उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने तसेच या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सहाय्यकारी  होईल  अशी मार्गदर्शक योजना  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने  तयार केली आहे.  दर्जेदार शिक्षणाद्वारे विद्यार्थी आणि आणि शिक्षकांचा समग्र विकास (स्टुडंट्स अँड टीचर्स होलिस्टिक ऍडव्हान्समेंट क्वालिटी एज्युकेशन- SARTHAQ) सार्थक असे या योजनेचे पूर्ण नाव आहे. भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे साजरे करणाऱ्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याचा भाग म्हणून धोरणाच्या अंमलबजावणीची योजना आज शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते जारी करण्यात आली.

वर्तमानातील शिक्षणाची स्थिती आणि संघराज्य कल्पनेच्या गाभ्याशी प्रामाणिक राहून ही योजना आखली आहे. स्थानिक संदर्भीकरण तसेच स्थानिक गरजा आणि आवश्यकतेनुसार बदल करत  ही योजना राबवण्याचे स्वातंत्र्य राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहे.

राज्ये, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था यांच्याशी विविध स्तरावरून व्यापक आणि सखोल विचार विनिमय करून तसेच सर्व संबंधितांकडून मिळालेल्या सूचना लक्षात घेऊन,  7177 सूचनांवर विचारविनिमय करून सार्थक  विकसित केले आहे.

धोरणाचा गाभा आणि लक्ष्य यांचा विचार करून ते टप्प्याटप्प्यांनी राबवण्याचे SARTHAQ चे उद्दिष्ट आहे.

SARTHAQ अंमलबजावणीनंतर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत पुढील बदल अपेक्षित आहेत.

 • शालेय शिक्षणासाठीचा नवीन राष्ट्रीय आणि राज्यमंडळाचे  अभ्यासक्रम , शिशूवर्गासाठी जोपासना आणि शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, प्रौढ शिक्षण या सर्वांची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या गाभ्याशी सुसंगत अशी आखणी, आणि अभ्यासक्रमातील सुधारणांसाठी मार्गदर्शन.
 • एकूण विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्यांच्या गुणोत्तरात (GER) मध्ये वाढ,  एकूण शिक्षणप्रवेशामध्ये वाढ, बदलाचा दर आणि शेवटपर्यंत शिक्षणात टिकून राहण्याचे प्रमाण यांच्यात वाढ याप्रमाणेच  शिक्षण सोडणाऱ्यांच्या संख्य़ेत तसेच शालाबाह् मुलांच्या संख्येत घट
 • शिशूवर्गातील मुलांसाठी गुणवत्तापुर्ण जोपासना आणि शिक्षण ECCE  आणि मूलभूत साक्षरता तसेच आकडेवारी यासंबधी तिसरी इयत्तेपर्यंतचे जागतिक पातळीचे ज्ञान
 • लहान वयात मातृभाषा, स्थानिक भाषा विभागीय भाषा यांच्यातून शिक्षणाच्या आदान प्रदानावर भर देत सर्व स्तरांवर शैक्षणिक परिणामातील विकास साधणे.
 • सर्व स्तरावरील अभ्यासक्रमात व्यावसायिक अभ्यासक्रम, क्रिडा, कला, भारताविषयीचे ज्ञान, 21 व्या शतकातील कौशल्ये, नागरिकत्वाची मूल्ये, पर्यावरणसंरक्षणाबद्दल जागरुकता यांचा समावेश.
 • सर्व स्तरावर प्रयोगात्मक शिक्षणाची ओळख आणि वर्गशिक्षणासाठी नवीन प्रयोगशील अध्यापनशास्त्र.
 • शिक्षणमंडळाच्या परिक्षा आणि विविध प्रवेश परिक्षांमधे सुधारणा
 • उच्च दर्जाचे व विविधांगी अध्यापन-अध्ययन  साहित्य
 • विभागीय/स्थानिक/गृह भाषेतून पाठ्यपुस्तकांची उपलब्धता.
 • शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या गुणवत्तेत सुधारणा
 • नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासातून क्षमता विकास
 • विद्यार्थी व शिक्षकांसाठी सुरक्षित, संरक्षित, सर्वसमावेशक आणि  अनुकूल शैक्षणिक वातावरण
 • मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा, अडथळ्याविना आणि आंतरशालेय सामायिक संसाधनाची उपलब्धता
 • ऑनलाईन आणि पारदर्शक सार्वजनिक प्रकटनाच्या व्यवस्थेद्वारा राज्यांमध्ये SSSA च्या स्थापनेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन यांच्यासाठी सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये एकसमान मानके
 • तंत्रज्ञानाची सांगड घालून शैक्षणिक योजना आणि शासनव्यवस्था,  याशिवाय  माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, वर्गात गुणवत्तापुर्ण ई-शिक्षणसाहित्य यांची उपलब्धता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News