पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येचा शेवगाव मधील पत्रकार संघटनांकडून निषेध!!! कडक कारवाईची मागणी


पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येचा शेवगाव मधील पत्रकार संघटनांकडून निषेध!!! कडक कारवाईची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण 

शेवगाव येथिल पत्रकाराच्या वतीने नगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे मंगळवारी काही इसमांनी मारहाण करत स्कार्पिओ गाडीतून अपहरण करून खून करण्यात आला,

     या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, केंद्रीय पत्रकार संघ,अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ इत्यादी पत्रकार संघटनेने आज शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करत कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे,

    यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव व दैनिक गावकरी चे निळकंठ कराड, केंद्रीय पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष व पुढारी दैनिकाचे तालुका प्रतिनिधी रमेश चौधरी, केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व दैनिक लोकमंथन चे रेवननाथ नजन,अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महाराष्टू राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब डोंगरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश देशमुख दैनिक भास्कर चे रवींद्र उगलमुगले,रामनाथ रुईकर, दैनिक पुण्यनगरीचे प्रवीण खोमणे,दादा पाचरणे,युनूस शेख,न्यूज 18 चे लक्ष्मण मडके, दैनिक पराक्रमी चे विधाटे सर, बाबा पालवे, अजय निजन, रावसाहेब निकाळजे, अलिम शेख, राजु घुगरे आदि पत्रकार यावेळी उपस्थित होते.

   यावेळी बोलताना मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव निळकंठ कराड म्हणाले की, दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ले होत आहेत, पत्रकाराला कोणताही पगार किंवा मानधन नसतानाही पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आपले काम करत आहेत, सरांना ताबडतोब संरक्षण देण्यात यावे व राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांना शासनाने भरीव अशी मदत करावी, व आरोपींना लवकरात लवकर खडक शासन व्हावे,अशी मागणीही यावेळी कराड यांनी केली शासनाकडे केली, या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेचा तीव्र निषेध केला आहे. जिल्ह्यातील पत्रकार संघटना व सामाजिक संघटनांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News