दौंड मध्ये जनतेच्या जीवाशी खेळ,इंजेक्शन गोळ्या उघड्यावर जाळण्याचा धकादयक प्रकार


दौंड मध्ये जनतेच्या जीवाशी खेळ,इंजेक्शन गोळ्या उघड्यावर जाळण्याचा धकादयक प्रकार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,दौंड शहरातील भीमा नदी तीरावर दशक्रिया विधी घाटावर भिंतीचा आडोशाला मोठ्याप्रमाणात इंजेक्शन गोळ्या उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न केला आहे,तेही अर्धवट स्थितीत जाळले गेले आहे,त्यामध्यें वापरलेले इंजेक्शन तसेच राहिले आहेत, अजून काय जाळण्यात आले आहे याचीही चौकशी करण्यात यावी,या प्रकारामुळे जनतेच्या जीवाशी खेळ कोण खेळत आहे अशी चर्चा सध्या दौंड शहरात सुरू आहे,याठिकाणी तालुक्यातील लोक दशक्रिया विधी करण्यासाठी  येत असतात,शहरातील लोक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येत असतात,लहान मुले खेळण्यासाठी येत असतात अशा वर्दळीच्या ठिकाणी असा धक्कादायक प्रकार घडला आहे,जनतेच्या जीवाशी खेळ कोण खेळत आहे याची चौकशी करण्यात यावी,आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News