मोठ्या लोकसंखेला विचारात घेता,वॉर्ड नं.२ साठी उप आरोग्य केंद्र तथा कोविड सेंटर सुरु करावे


मोठ्या लोकसंखेला विचारात घेता,वॉर्ड नं.२ साठी उप आरोग्य केंद्र तथा कोविड सेंटर सुरु करावे

शिर्डी :- ( राजमोहंमद शेख ) - लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात मोठा वॉर्ड असलेल्या श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.२ मध्ये एकूण बारा वॉर्ड आहेत, लोकसंख्येच्या मानाने वॉर्ड नं. २ असा मोठा वॉर्ड आहे याठिकाणी सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे, तसेच वॉर्ड नं. २ मध्ये गरीब, हातावर पोट असणारे तसेच रोज कमाऊन खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आरोग्याची समस्या म्हणा किंवा, आरोग्याकडे दुर्लक्ष म्हणा होणारच, कारण खाजगी डॉक्टर व त्यांनी दिलेले औषध- गोळ्यांचे पैसे नक्कीच गरिबांच्या खिशाला परवडणारे नाहीत. शहरात पालिकेचे रुग्णालये आहे मात्र ते वॉर्ड नं. २ पासून दूर असल्यामुळे गरीब लोकांकडे स्वतःचे खाजगी वाहन नाही,तसेच भाडोत्री रिक्षा त्यांना परवडणारे नसल्याने त्यांना आपल्या आरोग्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणे भाग पडते,वॉर्ड नं. २ सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या वार्डात धनगर वस्तीजवळ पालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी

जागा उपलब्ध करून दिल्यास, त्याचा फायदा फक्त वॉर्ड नं.२ साठीच न होता लगतचा परिसर जसे की, संजयनगर, गोपीनाथनगर, रामनगर,

रामानगर इतर भागातील नागरीकांना देखील होणार आहे. त्यामुळे आपल्या तालुक्याचे माननीय आमदार लहू कानडे साहेब व शहराच्या कर्तबगार नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक यांनी जातीने लक्ष घालून समस्त जनतेच्या भावनेचा व ज्वलंंत समस्येचा विचार करून लवकरात लवकर वॉर्ड नं.२ मधील उप आरोग्य केंद्राचा निर्णय घ्यावा यासोबतच या परीसरातील नागरीकांसाठी एक सरकारी कोविड सेंटरही तात्काळ सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जफरभाई शहा आणि  परीसरातील नागरीकांकडून करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News