बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने साजरा केला 58 वा राष्ट्रीय सागरी दिन-2021


बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने साजरा केला 58 वा राष्ट्रीय सागरी दिन-2021

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने आज 58 वा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला. भारतीय ध्वज फडकावीत एस.एस.लॉयल्टी या मेसर्स सिंदीया स्टीम नेव्हीगेशन कंपनीच्या व्यापारी जहाजाने पहिल्यांदा मुंबई ते लंडन असा प्रवास  5 एप्रिल, 1919 ला केला, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो.  भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेशी साधर्म्य साधणारी, “कोविड-19च्या पुढे शाश्वत नौवहन” ही  राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना होती.राष्ट्रीय सागरी दिनाच्या प्रसंगी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सागरी नौवाहक समुदायाला शुभेच्छा दिल्या आणि ते घेत असलेल्या कष्टांचे, त्यांच्या उत्साहाचे, धैर्याचे व कोविड महामारीच्या कठीण काळातील त्यांच्या कामाचे कौतुक केले.

“भारत बदलत आहे, पुढे जात आहे, आपण भूतकाळात सागरी प्रवासाचे नेतृत्व केल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन भारत उभारला जात आहे, आणि याच सागरी प्रवास क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करणार आहे”, असे विचार मांडवीय यांनी सकारात्मक भूमिकेतून मांडले.58 व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या संस्मरणार्थ एका ई-स्मरणिकेचे मांडवीय यांनी प्रकाशन केले, तसेच राष्ट्रीय सागरी दिन समारंभ समितीच्या वतीने पारितोषिक वितरणही केले. नौवहन महासंचालक,  या सोहळ्याच्या अध्यक्षपदी होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News