वारकरी संप्रदायात प्रथमच खेळली जाणार "वारकरी प्रीमियम क्रिकेट लीग 2021


वारकरी संप्रदायात प्रथमच खेळली जाणार "वारकरी प्रीमियम क्रिकेट लीग 2021

पुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे:

वारकरी संप्रदाय एकत्र येत देणार सामाजिक एकतेचा संदेश

पुणे प्रतिनिधी : राज्याला संतांची परंपरा मोठी आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती पंथाच्या साह्याने आध्यात्मिक उन्नती साधून, नैतिक सामर्थ्य वाढवणे व प्रापंचिक दुःखावर मात करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्यात निर्माण केला. वारकरी संप्रदाय या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असतो, त्यांच्या या जीवनात एक वेगळा आनंद निर्माण करण्याच्या हेतूने "वारकरी प्रीमियर क्रिकेट लीग 2021" ही स्पर्धा राबवित असल्याचे आयोजक प्रमोद रणनवरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी ह. भ. प. पांडुरंग शितोळे, दिलीप राक्षे आदी उपस्थित होते.

वारकऱ्यांचे किर्तनाच्या शैलीतील चौकार-षटकार आपण पाहिले असतील पण क्रिकेटच्या मैदानावरील चौकार-षटकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. ही स्पर्धा दिनांक 8 व 9 मे रोजी, ए. के. स्पोर्टस्, साळुंब्रे, मावळ, पुणे येथे संपन्न होणार आहे. या मध्यामातून वारकरी संप्रदाय एकत्र येत, राज्याला एक सामाजिक संदेश ही देणार आहेत. या क्रिकेट लिग मध्ये एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये गट-अ आणि गट-ब संघात सामने होणार आहे. यात सिंहगड सुभेदार, राजगड लायन्स, तोरणा सम्राट, किंग्ज इलेव्हन सज्जनगड, पन्हाळ गड योध्दा, अजिंक्य जंजिरा फायटर्स, पुरंदर वॉरियर्स, शिवनेरी टायगर्स, प्रतापगड योध्दा आणि लोहगड मावळ असणार आहेत. 

या क्रिकेट स्पर्धेची वैशिष्ट्ये म्हणजे फुल स्पीच टेनिस क्रिकेट स्पर्धा असणार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक आणि वारकरी अशा एकूण 150 वारकऱ्यांचा खेळाडू म्हणून सहभाग असणार आहे. संपूर्ण स्पर्धकांसाठी पाच लाखांची पारितोषिके असणार आहेत. सर्व वारकरी खेळाडू हे क्रिकेट पोशाखात मैदानात उतरतील, स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर विश्वविक्रमात नोंद करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News