दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे 90 तर तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, एक दिवसात 144 रुग्ण, दौंड तालुक्याची लॉक डाऊन च्या दिशेने वाटचाल


दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे 90 तर तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, एक दिवसात 144 रुग्ण, दौंड तालुक्याची लॉक डाऊन च्या दिशेने वाटचाल

विठ्ठल होले विशेष  प्रतिनिधी :

दौंड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ही दौंड तालुक्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे भविष्यात असेच रुग्ण वाढत राहिले तर दौंड तालुक्याची नक्कीच लॉक डाऊन च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे,जनतेचे संरक्षण करणारे पोलिसही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे रक्षण करताच जर कोरोनाच्या विळख्यात आला तर जनतेचे संरक्षण होणार कसं आणि ही रुग्णांची संख्या थांबणार कशी अशी चिंता डॉक्टर संग्राम डांगे यांनी व्यक्त केली आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक 5 एप्रिल रोजी स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटर मध्ये 54 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी  डॉक्टर सुरेखा पोळ यांनी दिली आहे, तर दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 316 लोकांची अँटीजेण तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 90 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामध्ये 61 पुरुषांचा समावेश आहे तर 21 महिला रुग्णांची भर पडली आहे, दौंड शहरासह तालुक्यात मिळून एकाच दिवसात 144 रुग्ण संख्या झाली आहे, दौंड शहरातील सर्वच मध्यवर्ती ठिकाणांमध्ये बंगला साईड, सरपंच वस्ती, ख्वाजा वस्ती, बालाजी नगर, कुंभार गल्ली, नवगिरे वस्ती, समता नगर, भैरवनाथ वस्ती, यादव वस्ती, आलेगाव, जनता कॉलनी, पंचशील थेटर, सिंधी गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चौक याठिकाणी रुग्ण सापडले  असून परिसरात गोपळवाडी, गार, नानविज गिरिम, पाटस, रोटी, कुरकुम, वडगाव, एस आर पी एफ ग्रुप या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत जनतेने लॉकडाउन शासनाने कडक निर्बंध लागू होण्याची वाट न पाहता स्वतःहून काळजी घेऊन  मास्कचा वापर करणे,गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हात स्वच्छ धुणे, लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे या सर्व गोष्टी जनतेने स्वतःहून सांभाळल्या पाहिजेत तेव्हाच कुठे तरी आपण यावर मात करू शकू असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी व्यक्त केले आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर दौंड तालुक्यात नक्कीच कडक निर्बंध लागू करावे लागतील पुणे जिल्ह्यात दौंड तालुका हॉटस्पॉट वर असून जनतेने स्वतः काळजी न घेतल्यास दौंड तालुका नक्कीच लोक डाऊन च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News