केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सैनिकांना वाहिली श्रद्धांजली


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सैनिकांना वाहिली श्रद्धांजली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडमध्ये 3 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. अमित शहा म्हणाले कीसैनिकांनी देशासाठी केलेले बलिदान व्यर्थ ठरणार नाही याची शहीदांच्या कुटुंबीयांना आणि देशाला मी खात्री देतो.

अमित शहा म्हणाले की नक्षलवाद्यांविरूद्ध आमचा लढा सामर्थ्यचिकाटी व तीव्रतेने सुरू राहील आणि आम्ही तो शेवटपर्यंत घेऊन जाऊ. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले,की आकडेवारीबाबत  मला अद्याप काही सांगायचे नाही कारण शोधमोहीम सुरू आहे.

अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि गृह मंत्रालयगुप्तचर विभाग आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News