श्रीगोंदा तालुक्याची आर्थिक राजधानी काष्टी येथे पोलीस चौकी उभारण्याची तरुणांची मागणी


श्रीगोंदा तालुक्याची आर्थिक राजधानी काष्टी येथे पोलीस चौकी उभारण्याची तरुणांची मागणी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- मनमाड बेळगाव या रस्त्यावर दौंड नगर दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गाव वसलेले आहे हे गाव श्रीगोंदा तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते काष्टी हे गाव रस्त्याच्या कडेला बसलेले असल्यामुळे येथे व्यापार पेठ मोठी असून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते शनिवारी भरणारा आठवडे बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून येथे जनावरांचा खूप मोठा बाजार भरतो, या ठिकाणी भाजी मंडई आठवडे बाजार वेगळा भरतो जनावरांचा बाजार वेगळा भरतो, शेळ्या-मेंढ्यांचा बाजार वेगळा आणि लिंबाचा निलावाचा बाजार वेगळा अशा पद्धतीने एका दिवशी एवढे मोठे बाजार भरत असलेले संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी ग्राहक येत असतात  या गर्दीचा फायदा घेणारे लोक या ठिकाणी वाढलेली आहेत पाकीटमारी,चोरी, लबाडी, फसवणूक असे प्रकार वाढल्याचे सचिन पाचपुते या तरुणाने या मागणी निवेदनाद्वारे मांडले आहे, कोणतीही अघटित घटना घडली अथवा अपघात घडला तर श्रीगोंदा येथून पोलीस या ठिकाणी येत असतात तोपर्यंत खूप वेळ जातो त्यासाठी काष्टी येथे स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी सचिन पाचपुते यांनी केली आहे आणि याला इतर तरुण आणि ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला आहे,मनमाड बेळगाव हा मुख्य रस्ता तसेच वाढलेली बाजारपेठ, आठवडे बाजार या दृष्टीने काष्टी येथे पोलिस चौकी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News