हंगेवाडीच्या मोहन रायकर यांची इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये निवड.


हंगेवाडीच्या मोहन रायकर यांची इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये निवड.

श्रीगोंदा प्रतिनिधी  अंकुश तुपे.  तालुक्यातील हंगेवाडी गावाचे सुपुत्र मोहन शिवाजी रायकर यांची इंडो-तिबेटन बॉर्डर (भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल) पोलीसपदी निवड झाली आहे. रायकर यांनी चिंभळे ता.श्रीगोंदा येथील हरितपरिवार संचलित ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय येथे दररोज पाच ते सात तास स्पर्धा परीक्षेचा जिद्द व चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. मोहन रायकर हा ज्ञानसागर वाचनालयाचा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणारा प्रथम विद्यार्थी आहे. अत्यंत कठीण व गरीब परिस्थितीवर मात करून खडतर परिश्रमाने मोहन रायकर यांनी सदरील यश संपादन केले. पुढील प्रशिक्षणासाठी तामिळनाडू येथे निवड झाली असून त्याची नियुक्ती उत्तराखंड येथील भारत-चीन सीमेवर झाली आहे.

             हरित परिवार संस्थेचे अध्यक्ष सचिन गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र मूर्तमोडे, सचिव अजित गायकवाड, अमोल गायकवाड, संतोष गायकवाड, हंगेवाडी,चिंभळा ग्रामस्थ व तालुक्यातून सर्व स्तरातून मोहन रायकर याचे शुभेच्छा व अभिनंदन होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News