6000 किलोमीटर पेक्षा जास्त रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करत रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणाचा रचला विक्रम; एका वर्षात विद्युतीकरणात 37 टक्क्यांची वाढ


6000 किलोमीटर पेक्षा जास्त रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करत रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणाचा रचला विक्रम; एका वर्षात विद्युतीकरणात 37 टक्क्यांची वाढ

31 मार्च 2021 पर्यंत 45,881 किमी रेल्वेमार्गांचे म्हणजेच 71% टक्के विद्युतीकरण पूर्ण

केवळ गेल्या तीन वर्षात रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचे 34% काम पूर्ण

पर्यावरणासाठी अत्यंत दिलासादायक पाऊल

प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी रेल्वेने कोविडचा संधी म्हणून केला वापर

भारतीय रेल्वेने 2020-21 या एकाच वर्षात 6,015 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे.

कोविड महामारीचा काळ असूनही गेल्यावर्षी म्हणजेच 2018-19  मध्ये 5,276 किमीचे रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचा विक्रम रेल्वेने यावर्षी स्वतःच मोडला आहे.

कोविडच्या अत्यंत कठीण काळात, वर्ष  2020-21 मध्ये 6000 किमी पेक्षा अधिक लांबीच्या  मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करणे हा रेल्वेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.  

यामुळे भारतीय रेल्वे अधिकाधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जेच्या दृष्टीनेही सक्षम बनली आहे.भारतीय रेल्वेचे सध्याचे ब्रॉड गेज नेटवर्क 63,949 किमी इतके असून त्यात कोकण रेल्वेचे 740 किमी धरल्यास, हे एकूण  64,689 किमी मार्ग इतके आहे.

यापैकी एकूण  45,881 किमी मार्ग म्हणजेच  71 % विद्युतीकरण 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाले आहे.

अलीकडच्या काळात, देशाचे आयातीत पेट्रोलियम इंधन म्हणजेच डीझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने, तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, एक पर्यावरण पूरक, जलद आणि उर्जा सक्षम अशा सार्वजनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देण्याच्या विचाराने, अलीकडच्या काही वर्षात रेल्वेच्या विद्युतीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे.

गेल्या सात वर्षात म्हणजेच 2014 ते 21 या काळात, आधीच्या सात वर्षांच्या म्हणजेच 2007-14 या काळाच्या तुलनेत, पाच पटपेक्षा अधिक विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

2014 पासून आजपर्यंत 24,080 किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले असून एकूण कामांपैकी 37% काम पूर्ण झाले आहे.

वर्ष 2007-14 या काळात 4,337 केवळ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते.

आतापर्यंत एकूण 45,881 रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आये असून, त्यापैकी 34 % काम गेल्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे.

भारतीय रेल्वेने  वर्ष 2020-21 मध्ये 56  कर्षण उपकेंद्रे (Traction Sub Stations) लोकार्पित केले आहेत, याआधी केवळ एका वर्षात 42 कर्षण उपकेंद्रे बांधून झाली होती, उपकेंद्र बांधणीच्या वेगातही कोविड काळात 33% सुधारणा झाली आहे.

गेल्या सात वर्षात रेल्वेने एकूण 201 कर्षण उपकेंद्रे बांधून पूर्ण केली आहेत.  

भारतीय रेल्वेने विद्युतीकरण पूर्ण केलेल्या काही महत्वाच्या रेल्वेमार्गांची यादी खालीलप्रमाणे.

 1. मुंबई-हावडा मार्गे जबलपूर
 2. दिल्ली-दरभंगा-जयनगर
 3. गोरखपूर-वाराणसी मार्गे अनुरिहार
 4. जबलपूर-नैनपूर-गोंदिया-बल्लारशाह
 5. चेन्नई-त्रिची
 6. इंदौर-गुणा-ग्वालियर-अमृतसर
 7. दिल्ली-जयपूर-उदयपूर
 8. नवी दिल्ली-न्यू कूचबिहार-श्रीरामपूर आसाम- द्वारे       पटना आणि कटिहार
 9. अजमेर-हावडा
 10. मुंबई-मारवाड
 11. दिल्ली-मोरादाबाद-तानकपूर

भारतीय रेल्वेने आपल्या सर्व रेल्वेमार्गाचे  डिसेंबर 2023 पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  संपूर्ण विद्युतीकारणाचे उद्दिष्ट साध्य केल्यास, वर्ष 2030  पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात रेल्वेचा मोठा हातभार लागू शकेल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News