प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनचा उपक्रम... अवयव दानातून इतरांचे जीवन समृद्ध व्हावे - जालिंदर बोरुडे


प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनचा उपक्रम... अवयव दानातून इतरांचे जीवन समृद्ध व्हावे - जालिंदर बोरुडे

प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण, फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अमोल पतंगे, लक्ष्मण बोरकर, अतुल वाघ, कैलास ढवळे, सचिन कोतकर, बब्बू सय्यद, दादा येणारे, बाबासाहेब चन्ने, बबलू शेख, नागेश बागल आदि.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी अर्पण केले. रयतेला जुलमी राजवाटीपासून सुटका करुन स्वराज्याची निर्मिती केली. अशा थोर राजांचा इतिहास आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याच प्रेरणेने फिनिक्स सोशल फौंडेशन कार्य करत आहे. मोफत नेत्र शिबीराच्या माध्यमातून लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेऊन या चळवळीत अनेकांना सहभागी करुन घेत आहोत. आपल्यानंतर आपल्या अवयवांचा इतरांना उपयोग होऊन त्याचे जीवन समृद्ध होऊन कायम स्मरणात राहावे, असे हे कार्य आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीदिनी सत्कार्य घडावे या हेतूने रिक्षा संघटनेने सामाजिक दायित्व जपून राबविलेला उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असाच आहे, असे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.

प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण, फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अमोल पतंगे, लक्ष्मण बोरकर, अतुल वाघ, कैलास ढवळे, सचिन कोतकर, बब्बू सय्यद, दादा येणारे, बाबासाहेब चन्ने, बबलू शेख, नागेश बागल आदि उपस्थित होते.याप्रसंगी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण म्हणाले, फिनिक्स फौंडेशनचे सामाजिक कार्यातून समाजातील वंचित घटकांसाठी काम होत आहे. या कार्यात आपलाही छोटासा हातभार लागवावा, या हेतूने आज अवयव दानाचा संकल्प करुन अर्ज भरुन दिलेले आहे. संघटनेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम सहभागी होऊन अशा उपक्रमात सहभागी झालो आहोत, असे सांगितले.

याप्रसंगी संतोष बिचकुल, प्रशांत शिंदे, शेख सुलतान, शेख कलिम, शहारुख पठाण, जमिर पठाण, बाबासाहेब धिवर, राजेंद्र बोरुडे,  आदि उपस्थित होते. याप्रसंगी अमोल पतंगे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. शेवटी बाबासाहेब धिवर यांनी आभार मानले. 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News