आ. शेखर निकम यांचा गुरववाडी मित्र मंडळातर्फे सत्कार


आ. शेखर निकम यांचा गुरववाडी मित्र मंडळातर्फे सत्कार

विलास गुरव 

चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम  यांचा गुरववाडी तरुण मित्र मंडळा तर्फे दि. २ एप्रिल रोजी सत्कार  करण्यात आला.  दरवर्षी अत्यंत उत्साहाने सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. होळी झाल्यानंतर पूजेचे आयोजन करण्यात येते. या वेळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येते.  

   परंतु, ह्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व राज्य शासनाच्या नियमानुसार अत्यंत साधेपणाने महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.  ह्या वर्षी पुजेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय आमदार शेखर निकम यांची उपस्थिती लाभली. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच गुरववाडीला भेट दिल्याने त्यांचे स्वागत व सत्कार  मंडळ व गावकऱ्यांतर्फे करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कांगणे, उपसरपंच शेखर उकाडे, बबु कवळकर, सरंद उपसरपंच समीर लोटणकर, तुषार हडप, नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी महीला मंडळा तर्फे  हळदीकुंकू समारंभ पार पडला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News