दौंड शहरातील गोवा गल्ली येथे आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन


दौंड शहरातील गोवा गल्ली येथे आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरातील गोवा गल्ली येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याचे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे यांनी माहिती दिली आहे,सदर व्यक्ती जॉन गुंजाळ यांच्या घरासमोर मयत झाला असून जॉन गुंजाळ यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे,सदर व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाच्या रेषा असलेला चॉकलेट कलरचा शर्ट घातलेला आहे गळ्यात मास्क म्हणून वापरलेला रुमाल आहे,सदर व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास दौंड पोलीस स्टेशनला 02117292333,9923356263  या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे,पुढील तपास प्रो मयूर भुजबळ,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा श्रावण गुपचे करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News