रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांकडून अटक, रेल्वे पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते मुद्देमाल परत


रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांकडून अटक, रेल्वे पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते मुद्देमाल परत

विठ्ठल होले विशेष  प्रतिनिधी :

-  दौंड पुणे दरम्यान रेल्वे गाडीमध्ये सोन्याची लगड आणि एम आय कंपनीचा मोबाईल चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली होती त्यावरून मुद्देमालासह एका तरुणास अटक केल्याची माहिती रेल्वे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय एम कलकुटगे यांनी दिली, जबलपूर पुणे एक्सप्रेस गाडी ने प्रवास करणारे राहुल रमेश जैन वय 38 व्यवसाय वकील,राहणार कृष्णकेबल, टाऊन शीप,ICICI बँकेसमोर कोंढवा पुणे हे जबलपूर पुणे एक्सप्रेस गाडी ने प्रवास करत असताना गाडी सकाळी 8 ते 8*30 वाजता केडगाव यवत दरम्यान असताना एका त्यांच्या हातातील फिकट गुलाबी रंगाची बॅग त्यामध्ये त्यांचा MI कंपनीचा 10000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 140 ग्रॅम वजनाची आणि 669200 रुपये किमतीची  सोन्याची लगड असा एकूण 679200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे दाखल झाली,सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांनी आदेश दिले आणि रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासण्यात आले,त्यामधून योगेश रमेश माने वय 27 वर्ष राहणार गौतम नगर तालुका दौंड जिल्हा पुणे याचे चौकशी केली असता सदरचा गुन्हा उघडकीस आला असून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, या आरोपीवर पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन,अहमदनगर लोहमार्ग    पोलीस स्टेशन आणि दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत, सदरची कारवाई लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील,लोहमार्ग अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार,लोहमार्ग  उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर,लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मौला सय्यद,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहमार्ग पुणे बी एस अंतरकर,दौंड रेल्वे पोलिस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक वा य एम कलगुटगे,पो हवा कदम,पो हवा दांगट,पो शिपाई मते,पो शिपाई भोसले,महिला पो शिपाई थोरात यांनी सदरची कारवाई केली आहे.पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या हस्ते फिर्यादी राहुल जैन यांना त्यांचा सर्व मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News