पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी ग्लोबल ग्रेट लॉरिस्टर सन्मानाने अभिवादन


पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी ग्लोबल ग्रेट लॉरिस्टर सन्मानाने अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - देशातील जातीय अत्याचार थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीपणाने मोठे कार्य केले. त्यांच्या सन्माना प्रित्यर्थ मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बुधवार दि.14 एप्रिल रोजी जयंती दिनी ग्लोबल ग्रेट लॉरिस्टर सन्मानाने अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर जातीय गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन बायोलॉजिकल बिलिफ इन रिचमेंट मॅकेनिझम हे तंत्र अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 

भारतात स्वातंत्र्यपुर्वपासून जातीय अत्याचार होत आले आहेत. जातीय अत्याचार थांबविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे जातीअंत कृष्णविवर निर्माण झाले. अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्योत्तरकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. जातीय व्यवस्था ही जैविक धारणा आहे. जैविक धारणा समाजाला घातक असल्यास ते नष्ट करण्याचा अधिकार मानवाला मिळाला. जैविक धारणेमुळे धर्मा-धर्मात व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. नव्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा अंगीकार केल्यास जातीयवाद संपणार आहे. कर्तव्याची उर्मी, सारासार विवेकासह उन्नतचेतना, लोककर्तव्याची ऊर्जा यामधून हे घडणार आहे. मानवजातीला लागलेली जातीयवादाची किड बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन बायोलॉजिकल बिलिफ इनरिचमेंट मॅकेनिझम हे तंत्र स्विकारुन होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे एकविसाव्या शतकातील मनुष्य जातीय गुलामगिरीतून बाहेर पडणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News