शेवगाव स्वस्त धांन्य वितरणाचा ठेका काढून घ्या ! अन्यथा आंदोलन...प्रहार जनशक्ती तसेच शिवसंग्राम संघटनेचा इशारा


शेवगाव स्वस्त धांन्य वितरणाचा ठेका काढून घ्या ! अन्यथा आंदोलन...प्रहार जनशक्ती तसेच शिवसंग्राम संघटनेचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण

शेवगाव तालुका पुरवठा विभागातील गोंधळ हा आता राज्यपातळीवर जाऊ पाहत आहे, एवढेच नव्हे तर ह्या स्वस्त धान्य दुकानाच्या वादावादी वरून मागील दोन चार दिवसापूर्वी तहसीलच्या दालनातच हाणामाऱ्या झाल्यामुळे हा विषय महाराष्ट्र राज्याच्या पटलावर येऊ पाहत आहे, परंतु पोलिस व महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप पर्यंत ह्या प्रकरणावर झालेली दिसत नाही, पुरवठा विभाग तर हात वर करुन प्रत्येक वेळेस तांत्रिक बाबी दाखवून मोकळ होत आहे, याचा अर्थ स्वस्त धान्य दुकानादार व रेशन माफियांची पाळेमुळे पुरवठा विभागात किती खोलवर रुजलेली आहेत हे त्यावरून समजते,

      काल गुरुवारी एक एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती संघटना शेवगाव तालुका यांच्यावतीने उपविभागीय कार्यालय पाथर्डी यांच्या समोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले,शेवगाव पुरवठा विभागाचा अन्नधान्य वितरणाचा ठेका हा प्रदीप नानासाहेब काळे व योगेश नानासाहेब काळे त्यांच्याकडे आहे त्यांचा स्वतःच्या मालकीचे ट्रक व टेम्पो आहेत,मागील महिन्यात आठ तारखेला शासकीय गोदामातून प्रत्येक गहू व तांदळाच्या कट्ट्या मधून एक ते दीड किलो धान्य काढून तसेच काही धान्य दुकानदाराकडून काळ्या बाजारात विकत घेऊन सदर धान्य तीस क्विंटल गहू व तांदूळ पन्नास क्विंटल काळ्या बाजारात जात आसतांना अमरापूर येथील ग्रामस्थांनी पकडला, त्यावर शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवनावश्यक कायदा कलम १९५५ नुसार ३/७ सर गुन्हा दाखल झाला असून सध्या प्रदीप काळे हा जामिनावर बाहेर आलेला आहे, तसेच प्रदीप नानासाहेब काळे हा पारनेर,राहुरी,शेवगाव या तीन तालुक्यात वाहतुकीचा ठेका घेतलेला असून त्याच्या माध्यमातून काळाबाजार करीत असले बाबत निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे, तरी प्रहार संघटनेने करून निवेदनात असे म्हटले आहे की, नानासाहेब काळे व योगेश नानासाहेब काळे यांच्याकडून सदरचा वाहतुकीचा ठेका काढून घ्यावा,अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रहार संघटनेने या निवेदनात दिला आहे, या दोन्ही भावांना गोडाऊन मधून बडतर्फ करण्याची मागणीही यावेळी प्रहार संघटनेने निवेदनात केली आहे,

     प्रहार संघटनेचे शेवगाव येथील पदाधिकारी पाथर्डी येथे आंदोलन करण्यासाठी गेले असताना आंदोलनकर्त्यांशी प्रांत अधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी चर्चा करून गुरुवारी होणारे आंदोलन चर्चेअंती स्थगित करण्यात आले,

       तसेच पुरवठा विभागाच्या सरकारी गोडाउन मध्ये वाहतूक ठेकेदार यांना येण्यास प्रतिबंधक करण्यात यावा, व तत्काळ ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणीही प्रहार जनशक्ती संघटनेने यावेळी उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांना केली आहे, आंदोलन स्थगित केल्यानंतर प्रांत अधिकारी देवदत्त केकान यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत,

       या आदेशाच्या प्रती प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप बामदळे, शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांना देण्यात आल्या आहेत

तर दुसरीकडे शासकीय गोदामात झाला वाढदिवस साजरा

एकीकडे स्वस्त धान्य वितरणाच्या कामांमध्ये आरोपी असलेला प्रदीप काळे त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना त्याचा वाढदिवस शेवगाव पुरवठा विभागातील शासकीय गोदामातील हमालां सोबत वाढदिवस साजरा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे, स्वस्त धान्य वितरण मधील मुख्य आरोपी असलेला काळे चा वाढदिवस शासकीय गोदामात कसा होऊ शकतो यावर जनतेमध्ये उलट-सुलट चर्चा आहे, यावरून अहमदनगर पुरवठा विभागाची सरकारी यंत्रणा किती भ्रष्ट व पोखरलेली आहे, हे लक्षात येते,आता परत काळे वर कारवाई होणार का? का पुरवठा विभागाची यंत्रणा मॅनेज होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .

एक शासकीय अन्नधान्य वितरणातील मुख्य आरोपीने अशाप्रकारे शासनाच्या पुरवठा विभागातील गोडाउन मध्ये जाऊन वाढदिवस साजरा करणे चुकीचे आहे, या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल व संबंधितांना याचा जाब विचारला जाईल

जयश्री माळी मॅडम,

जिल्हा पुरवठा अधिकारी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News