डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अधिग्रहण करण्यासंदर्भात प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत सकरात्मक बैठक संपन्न..


डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अधिग्रहण करण्यासंदर्भात प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत सकरात्मक बैठक संपन्न..

श्रीगोंदा: प्रतिनिधी अंकुश तुपे

राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा व स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना महामारीच्या संक्रमनात रुग्णांना अलगिकरण करण्यासाठी श्रीगोंदयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पुन्हा कोविड केअर सेंटर (ccc) स्वरूपात ताब्यात घेण्याच्या उद्देशाने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

श्रीगोंदयातील covid-19 चे रुग्ण अलगीकरण करण्यासाठी शहराच्या जवळील मोठया शासकीय इमारतींचा सर्वे करण्यात आला. ज्यात मांडवगण येथील निवासी शाळा, पारगाव मधील शाळा, सैनिकी वसतिगृह व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृृृहाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रांताधिकारी यांनी येथील प्रशासकीय इमारतींपैकी एक इमारत अधिग्रहण करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व पुढाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली. यावेळी मांडवगण मधील निवासी शाळा श्रीगोंदा शहरापासून दूर असून, तेथे कोविड केअर सेंटर बनविणे गैरसोयीचे होत आहे, शहरातील महात्मा फुले सैनिकी मुलांचे वसतिगृह व पारगावची शाळा अपुरी पडत असून, खाजगी संस्थामध्ये साधारण माणसांची आर्थिक पिळवणूक होईल म्हणून, पर्यायाने राज्य शासनाची श्रीगोंद्यातील प्रशस्त इमारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाबाबत चर्चा करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या परीक्षेचा विचार करता, स्थानिक प्रशासनाने त्यांना येथील एका खाजगी शैक्षणिक संकुलात स्थलांतरित करून, दर्जेदार सुविधा देण्याची हमी दिली. यावर काही स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. मात्र, काहींनी covid-19 हा सर्व जगावर झालेला प्रकोप असून, आता सामाजिक प्रक्रियेपेक्षा देशहित महत्त्वाचे असल्याचे मत नमूद केले. आंबेडकर वसतिगृहामध्ये साधारण दोनशे रुग्णांची व्यवस्था होणार आहे. ३० विद्यार्थी सध्या तिथे वास्तव्यास असून, उर्वरित जागा पडून आहे. त्या जागेचा वापर होत मुलांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करीत, या ठिकाणी कोविड केअर सेंटर बनवण्याबाबत चर्चा करण्यात आली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सबलीकरण व शैक्षणिक गुणवत्तेसाठी सदरील वसतिगृहांची निर्मिती राज्य शासनाने केली असल्याने विद्यार्थ्यांना पुढील सुविधां उपलब्ध करून त्यांची व्यवस्था करण्यास काही हरकत नसल्याबाबत बैठकीत अनेकांनी सांगितले. मात्र, समाजाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, त्यांच्या अभ्यासाची गैरसोय होत गुणवत्तेवर परिणाम होईल, असेही काहींनी नमूद केले. समाजाबरोबर देश हीतही महत्वाचे आहे. सदरील आजार कोणाचा समाज बघून प्रादुर्भाव करायचे थांबणार नसल्याचे मत यावेळी काहींनी मांडले. या बैठकीसाठी (प्रांताधिकारी) धावडे मॅडम, (तहसीलदार) प्रदीप पवार, (पंचायत समितीचे गटविकास अधिकारी) प्रशांत काळे, (तालुका आरोग्य अधिकारी) डॉ. नितीन खामकर, (नायब तहसीलदार) चारुशिला पवार, (जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष) बाबासाहेब भोस, घनश्याम आण्णा शेलार, प्रा. तुकाराम (नाना) दरेकर, (जिल्हा परिषदेचे माजी सदस्य) अनिल ठवाळ, (ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, वसतिगृहाचे कर्मचारी प्रवीण साळवे, (काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष) स्मितल भैया वाबळे, सुनिल ओहोळ सह राजकीय, सामाजिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अधिग्रहण करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पुढाऱ्यांत सकरात्मक चर्चा संपन्न झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News