विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुभ अंतर्गत येणारे गोपाळवाडी उपकेंद्रांमध्ये कोविडची लस 1 एप्रिलपासून देण्यास सुरुवात करण्यात आली,45 वय वर्ष असणाऱ्या पासून पुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोविडची लस घेण्याचे आव्हान करण्यात आले होते,या आव्हानाला जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आज पहिल्याच दिवशी तब्बल 97 लोकांनी लस घेतल्याचे आरोग्य सेविका जयश्री शिंदे यांनी सांगितले,लस घेण्याविषयी लोकांमध्ये संभ्रम असताना गोपळवाडी मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी कुरकुम आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉक्टर राजेश पाखरे यांनी गोपाळवाडी उपकेंद्रांमध्ये भेट देऊन लसीकरणासाठी आलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले, सर्वांनी ही लस घ्यावी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले, गोपाळवाडी उपकेंद्राच्या डॉक्टर प्रज्ञा खोमणे (पवार) यांनी आलेल्या सर्व लोकांची तपासणी करून त्यांना लस घेण्याचे आवाहन केले,यावेळी गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,Dr. राजेश पाखरे मेडिकल ऑफिसर प्रा. आ. केंद्र कुरकुंभ, खंडागळे(IMF), कोळी(आ. सहा.) Dr. प्रज्ञा खोमणे (आ. स. अ ),शिंदे जयश्री(आ.सेविका )
पोळ गौतम (आ. सेवक )
शेजाळ राम (आ. सेवक )
उपकेंद्र गोपाळवाडी येथील आशा सेविका सोनाली तरटे, आशा देशमुख,रंजना उन्हाळे,पापिता डोंगरे,स्वाती म्हेत्रे,सुरेखा शितोळे,रुपाली लोंढे उपस्थित होते.