- शिवजयंतीनिमित्त आर्या फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन!


- शिवजयंतीनिमित्त आर्या फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन!

आर्या फाऊंडेशन वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यास पुस्तकरूपी भेट ! 

पुणे प्रतिनिधी /सागरराज बोदगिरे:

कोरोना काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. ही समस्या दूर करण्यासाठी शिवजयंती निमित्त आर्या फाऊंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर व्यंकटसाई होंडा यांच्या सौजन्याने धायरी येथील अथोराईस शोरुम चाकणकर कॉर्नर येथे पार पडले. अनेक नागरिकांनी या शिबिरात माणुसकीच्या नात्याने सहभाग नोंदवला. यावेळी सामाजिक जागृती वाढवण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यास छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर... या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली. शिवजयंती उत्सव आणि रक्तदान शिबिराला संस्थापक संतोष कदम, सुहासबाप्पू चाकणकर, हरिश्चंद्र दांगट, महेश सोनवणे, विजय चाकणकर, प्राज भिलारे, राजेंद्र मानकर, जितेंद्र भामे, सुमित बेनकर, विक्रम चाकणकर, सनी चाकणकर, राजेंद्र चव्हाण, दत्तात्रय काळे, योगश नाईक, परिमल देशपांडे, दीपक नागपुरे, कैलास लहाने आणि शिववंदना मित्र परिवार उपस्थित होते.

कोरोना काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात रक्ताची कमतरता निर्माण होऊ लागल्याने नवीन समस्या उद्भवत आहे. यावर उपाय म्हणून आर्या फाऊंडेशनचे संस्थापक संतोष कदम यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

यावेळी बोलताना कदम म्हणाले, प्रत्येक रक्तदात्याच्या आणि ज्याला हे रक्त दान केले जाईल या दोघांच्या समाधानाने या संस्थेचे उद्दिष्ट साध्य होते. समाज हितासाठी एक पाऊल पुढे टाकून रक्तदान करून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकांना रक्ताच्या तुटवड्यामुळे प्राण गमवावे लागत आहेत. रक्तदानाचा एक निर्णय कोणासाठी तरी लाख मोलाचे ठरू शकतो. रक्तदान करून ही शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल, या दृष्टिकोनातून संस्थेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News