वाकी उपकेंद्रात कोव्हीड लसीकरणाचा शुभारंभ


वाकी उपकेंद्रात कोव्हीड लसीकरणाचा शुभारंभ

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी कोव्हीड १९ ही लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती परंतु मुर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या वाकी परिसरातील मोढवे, ऊंबरवाडी तसेच जगतापवस्ती, भंडलकरवस्ती, धरणवस्ती या   ठिकाणच्या नागरिकांना मुर्टी हे अंतर जास्त असल्याने व सात आठ किलोमीटरवर जाण्यायेण्याच्या गैरसोयींमुळे वाकी येथे या लसीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

  या कार्यक्रमाचा शुभारंभ बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

      याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब नलावडे, बाळासाहेब जगदाळे, वाकीचे सरपंच किसन बोडरे, उपसरपंच हनुमंत जगताप,  ग्रामपंचायत सदस्य, मुर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल उबाळे वाकी उपकेंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम मुलाणी, आरोग्य सेविका जयश्री कारंडे, आरोग्य सेवक किशोर काळोखे, ग्रामसेविका पूजा गायकवाड आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गाडे यांनी तर आभार उपसरपंच जगताप यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News