पर्यावरण संवर्धनासाठी प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजना राबविण्याची मागणी


पर्यावरण संवर्धनासाठी प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजना राबविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - तुकाराम बीजेचे चौचित्यसाधून पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजना राबविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

पर्यावरण संवर्धन व वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराची गरज आहे. जलयुक्त जंगल योजनेमुळे वन विभागाच्या जमिनीवर तसेच डोंगर परिसरात भीम हनुमान बंधारे बांधता येणार आहे. या बंधार्‍यातून जमिनीची पाणी पातळी वाढून, उन्हाळ्याच्या तीन-चार महिने वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व अन्नाची सोय होणार आहे. जंगलांची कत्तल होत असल्याने प्राण्यांसाठी अन्न, पाणीचा प्रश्‍न उद्भवत आहे. त्यामुळे वन्यप्राणी शहराकडे धाव घेताना दिसत आहे. तसेच जंगल भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांचा देखील गंभीर प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. वन विभागाचे जमिनी फक्त सातबाराच्या रेकॉर्डवर आहेत. वन विभागात असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदीमुळे या जमीनीवर अतिक्रमण झाले. वन जमीनीत वनवे पेटवून शेतीसाठी त्याचा वापर सुरु असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. पर्यावरणाचे प्रश्‍न तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात मांडले. त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश मानवजातीच्या कल्याणासाठी दिला. एका महात्म्याचे विचार प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजनेद्वारे केंद्र सरकारने राबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून अपेक्षा नसून, वन विभागाचे मंत्री व अधिकारी बाईंच्या लफड्यात अडकल्याने त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात येऊ शकत नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. वन्यप्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. मनुष्यावर अनेक नैसर्गिक संकटे ओढवत असून, त्याला जबाबदार पर्यावरणाचा असमतोल आहे. पर्यावरणाच्या समतोल साधण्यासाठी जलयुक्त जंगल योजना उपयुक्त ठरणार आहे. ही योजना राबविण्यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, ओम कदम, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल आदी प्रयत्नशील आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News