शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना विविध मागण्या विषयी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे निवेदन


शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना विविध मागण्या विषयी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे निवेदन

गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : याविषयी आमच्या प्रतिनिधीला सविस्तर माहिती देताना  श्री विठ्ठल सावंत म्हणाले की दिनांक ३०/०३/२०२० रोजी श्री गौतम कांबळे राज्याध्यक्ष शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी मुंबईचा दौरा केला .या दौऱ्यात त्यांनी मा .हसन मुश्रीफ साहेब ग्राम विकास मंत्री व मा . वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री तसेच मा .बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांच्या भेटी घेतल्या व शिक्षकांच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा केली .

यावेळी *महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ संलग्न मुलनिवासी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे सर , राज्य कार्याध्यक्ष हौशिराम गायकवाड सर,पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत* *सलवदे सर भोर तालुका महासचिव श्री चंद्रकांत शिंदे सर यांनी, थेट भेट कार्यक्रम क्रमांक -६ अंतर्गत*

१) *ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब*

२) *शिक्षणमंत्री आदरणीय नामदार वर्षाताई गायकवाड मॅडम*

३) *सहकार मंत्री आदरणीय नामदार श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्याशी*

*शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात आज भेट घेऊन चर्चा केली त्यामध्ये*

१)मा .हसन मुश्रीफ ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संघटनेच्यावतीने निवेदन देऊन शिक्षकांच्या अडीअडचणी ,बदली धोरण याबाबत चर्चा व अडचणी सोडविण्यासाठी विनंती केली .

२)मा .वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या अडचणी मांडल्या .सविस्तर चर्चा केली तसेच अधिकाऱ्यांसोबत संघटनेची मीटिंग लावण्याची विनंती केली असता त्यांच्या कार्य-निष्पादन अधिकाऱ्यांना संघटनेसोबत लवकरात लवकर मीटिंग लावण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिले .

३)मा .बाळासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन कर्मयोगी सुभाषअण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा केली .

प्राथमिक शिक्षकांच्या बदली संदर्भातील निवेदन ग्रामविकास विभागाचे  प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले .या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदली संदर्भातील जीआर पुढील आठवड्यात निर्गमित करण्यात येईल असे खात्रीशीरपणे समजले .राज्याध्यक्ष यांच्या दौऱ्याविषयी बोलताना श्री सावंत म्हणाले की

श्री गौतम कांबळे सर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आजारी असतानाही व कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या जवळ थांबणे गरजेचे असतानाही संघटनेच्या कामासाठी सहकारी पदाधिकाऱ्यांसह सकाळी पाच वाजता मुंबईला निघाले .तेथे वेळेत पोचून तीन कॅबिनेट मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या अडी-अडचणी मंत्रीमहोदयांनी समोर मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .यावेळी श्री सावंत यांनी शिक्षकांना अवाहन करताना म्हटले की गरज आहे ती शिक्षकांच्या मदतीची, सहकार्याची व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची .आपण नक्की संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल अशी अपेक्षा बाळगतो व वृत्तसंकलन आपणास पाठवतो अशी माहिती श्री विठ्ठल सावंत राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ संलग्न मूलनिवासी शिक्षक संघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News