विठ्ठल होले विशेष प्रतिनीधी :
- दिनांक 29.3.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ तसेच पोलीस अंमलदार विशाल जावळे,किरण ढुके, आप्पासाहेब करे असे हजर असताना पोलीस उप अधीक्षक श्री मयुर भुजबळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे मल ठण गावचे हद्दीत भीमा नदीच्या पात्राच्या कडेला तसेच हिंगणी बेरडी ज्योतिबा मळा गावच्या हद्दीत 1) बाळू अशोक दळवी राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे 2) सुभाष बलभीम लोंढे राहणार हिंगणी बेरडी तालुका दौंड जिल्हा पुणे हे बेकायदेशीर विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच मयूर भुजबळ हे स्वतः टीम सोबत सदर ठिकाणी जाऊन दोन्ही हातभट्टी यांवर छापा टाकला असता तेथे सुमारे दोन लाख रुपये किमतीचा गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने मिळून आली त्यात गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन अंदाजे 15 हजार लिटर 52 प्लास्टिकचे ड्रम चार मोठी लोखंडाचे ड्रम व इतर दारू काढण्यासाठी लागणारी साधने मिळून आले ते साधने सदर पोलीस टीम ने जागीच नष्ट केली व सदर इस मान विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास बीट आमदार सहाय्यक फौजदार संतोष शिंदे हे करीत आहेत सदरची कारवाई ही
*पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ,पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण ढुके, आप्पासाहेब करे, डी व्ही ढोले यांनी केली*