संकष्टी चतुर्थी दिवशीही गणपती मंदिर राहणार बंदच


संकष्टी चतुर्थी दिवशीही गणपती मंदिर राहणार बंदच

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

कोरोना या विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव व उद्या बुधवार दि ३१ मार्च रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी होणारी संभाव्य गर्दी  लक्षात घेता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखालील अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर, थेऊर येथील चिंतामणी मंदिर व चिंचवडचे मोरया गोसावी समाधी स्थळ बंद ठेवले जाणार आहे. याबाबतचा आदेश बारामती व हवेली प्रांताधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.

         बारामती तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या व उद्या बुधवार दिनांक 31 मार्च रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी होणारी संभाव्य गर्दी यांचा विचार करता  प्रतीबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी  मयुरेश्वर मंदिर बंद बाबतचा आदेश काढला आहे. 

 दिनांक 30 रोजी हा आदेश चिंचवड देवस्थान ट्रस्ट ला प्राप्त झाला असून या आदेशाचे पालन करून मयुरेश्वर मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच देवस्थानच्या अधीपत्याखाली असलेले थेऊर येथील चिंतामणी मंदिर व चिंचवड येथील श्रीमान मोरया गोसावी समाधी मंदिर बंद राहणार आहे याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन विश्वस्त पवार यांनी केले आहे.

उद्या मंदिर परीसरात गर्दी करु नये व प्रशासन, चिंचवड देवस्थान ट्रस्ट्ला सहकार्य करावे. या बंदकाळात श्रींच्या परंपरेने चालत आलेल्या पूजा-अर्चा, नैवद्य व इतर धार्मिक विधी हे संपन्न होणार आहेत. तर  गुरुवार दिनांक 1 एप्रिल रोजी भाविकांना पहाटे साडेपाच वाजल्यापासून नेहमीप्रमाणे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News