फॅन्सी नंबर प्लेट, विनापरवाना वाहन चालकावर होणार कारवाई, कोरोना विषयी नियमांचे पालन करा -- प्रो. मयूर भुजबळ


फॅन्सी नंबर प्लेट, विनापरवाना वाहन चालकावर होणार कारवाई, कोरोना विषयी नियमांचे पालन करा -- प्रो. मयूर भुजबळ

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

वाळू माफियांचा कर्दनकाळ ठरलेले सिंघम पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी आज दौंड पोलीस स्टेशनला पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषयी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याविषयी कडक नियम लागू करणार असल्याची माहिती दिली, यावेळी पोलिस निरीक्षक नारायण पवार तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते, यावेळी पुढे बोलताना प्रोबेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ म्हणाले की शहरांमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच ट्रिपल सीट फिरणारे,विनापरवाना फिरणारे, गाड्यांचे सायलेन्सर वाजवणारे या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, मागील आठ दिवसांमध्ये शिरापूर, राजगाव, हिंगणी बेरडी भागातील नदीपात्रामध्ये वाळू माफिया वर कारवाई करून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे आता दौंड शहरातील या सर्व वाहनधारकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले, कोरोना विषयी बोलताना त्यांनी सांगितले कोरोना या महामारीचे शहरासह तालुक्यामध्ये रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्या अनुषंगाने जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, लॉक डाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा,राज्य शासनाने 27 मार्च मध्य रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत, व्यवसायिकांनी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असल्यामुळे कोणी दुकाने चालू ठेवू नये,यावेळेत 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास प्रत्येकी 1000 रुपये दंड,मास्क न वापरणे 500 रुपये,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 500रुपये,विवाहासाठी फक्त 50 लोकांना परवानगी,उल्लंघन करणाऱ्या कार्यालयास शिल केले जाईल,अंत्यविधी साठी 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे,कोणतेही राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम यांना परवानगी नाही, हॉटेल व्यवसायिकांनी दिवसभर हॉटेल चालू ठेवताना 50% च्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून घेऊ नये सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे,जनतेने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मयूर भुजबळ यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News