पाच अखिल भारतीय सर्वेक्षणांसाठी श्रम विभागाकडून मास्टर ट्रेनर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


पाच अखिल भारतीय सर्वेक्षणांसाठी श्रम विभागाकडून मास्टर ट्रेनर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

MB NEWS NETWORK

देशभरात पाच अखिल भारतीय सर्वेक्षण सुरु करण्यासाठी  आयोजित होत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या मालिकांतर्गत विभागाने कोलकाता येथे 24 ते 26 मार्च 2021 दरम्यान पर्यवेक्षक/ तपासनीस यांच्याकरिता स्थलांतरित मजुरांविषयीचे अखिल भारतीय सर्वेक्षण आणि अखिल भारतीय तिमाही आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षणविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले.श्रम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हे प्रशिक्षण देण्यात आले आणि यामध्ये या सर्वेक्षणामध्ये सहभागी होणारे पर्यवेक्षक आणि विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांव्यतिरिक्त देशभरातील अनेक पर्यवेक्षक/ अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. दोन्ही प्रकारचे सर्वेक्षण करताना प्रभावी पद्धतीने पर्यवेक्षण करता यावे या उद्देशाने या अतिशय खडतर आणि सखोल अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांविषयीचे अखिल भारतीय सर्वेक्षण आणि अखिल भारतीय तिमाही आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षणासाठी सर्वेक्षण यंत्रणेबाबतचे तपशीलवार सादरीकरण यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. या दोन्ही सर्वेक्षणांसाठी पर्यवेक्षकांना सर्वेक्षणाचा उद्देशसर्वेक्षण यंत्रणा आणि घरोघरी जाऊन करावयाचे फील्ड वर्क याची माहिती या दोन दिवसीय कार्यक्रमात समांतर सत्रांमध्ये देण्यात आली.  दोन्ही सर्वेक्षणांमध्ये अतिशय उच्च दर्जाचे परिणाम प्राप्त करण्याच्या उद्देशाने या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती.स्थलांतरित मजुरांविषयीचे अखिल भारतीय सर्वेक्षण आणि अखिल भारतीय तिमाही आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षण एक एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. इतर तीन सर्वेक्षणे देखील एका पाठोपाठ एक पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. कामगार आणि रोजगार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची माहिती उपलब्ध करण्याचे काम या सर्व सर्वेक्षणांच्या माध्यमातून होणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News