भ्रष्टाचार, अनागोंदी व जातीच्या उतरंडी नष्ट करण्यासाठी बिलिफ इनरिचमेंट बायोटेक्नोलॉजी तंत्राच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संघटनांचा पुढाकार


भ्रष्टाचार, अनागोंदी व जातीच्या उतरंडी नष्ट करण्यासाठी बिलिफ इनरिचमेंट बायोटेक्नोलॉजी तंत्राच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संघटनांचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार, अनागोंदी व जातीच्या उतरंडी नष्ट करण्यासाठी बिलिफ इनरिचमेंट बायोटेक्नोलॉजी या तंत्राचा वापर करुन बदल घडविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे  मेरा अपना घर आंदोलनने पुढाकार घेतला आहे. या तंत्राचा अवलंब करण्यासाठी आग्रह धरला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनागोंदी माजलेली आहे. सर्वसामान्यांना कायद्याच्या राज्याची प्रचिती येत नाही. लोकशाहीचे चारही स्तंभ जबाबदारीने वागताना दिसत नाही. भ्रष्टाचार, अनागोंदी व जातीच्या उतरंडी समाजातून हद्दपार करण्यासाठी बिलिफ इनरिचमेंट बायोटेक्नोलॉजी हे प्रभावी तंत्र आहे. हे तंत्र मानसशास्त्र व जीवशास्त्रावर आधारित असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

सार्वजनिक जीवनात व्यक्तीची शैक्षणिक पात्रता लक्षात घेतली जाते. मात्र त्यांचे विचार व संस्काराला किंमत दिली जात नाही. यामुळे चुकीचे व्यक्ती पदवी घेऊन जबाबदारीच्या पदावर गेल्याने अनागोंदी माजत आहे. उन्नतचेतनेचा स्विकार करुन जातीच्या उजरंडी सहज दूर होऊ शकतात. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार घडविणे अपेक्षित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, ओम कदम, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले आदी प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News