सत्यशोधक रघुनाथ ढोक दैनिक तुफान क्रांती च्या आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने नुकतेच सन्मानित


सत्यशोधक रघुनाथ  ढोक दैनिक तुफान क्रांती च्या आदर्श सेवा सन्मान  पुरस्काराने नुकतेच सन्मानित

पुणे- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक  यांच्या सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील तसेच त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ,तालुक्यात,गावोगावी मोफत सत्यशोधक विवाह  व राजस्थान, हरियाणा सामाजिक कार्य आणि नुकतेच तेलंगाणा राज्यात प्रथमच मोफत सत्यशोधक विवाह लावून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेली सत्यशोधक  चळवळ खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन, दैनिक तुफान क्रांती तृतीय वर्धापन दिनानिमित्त दैनिक तुफान क्रांती माणदेश नगरी सांगोला समूह च्या वतीने (दि. २१) मार्च रोजी दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर , नायब तहसीलदार साहेबराव मंडवे ,माता फेज्जून मुजावर व  इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जिजामाता मल्टीपर्पज हॉल येथे दैनिक तुफान क्रांती तृतीय वर्धापनदिन सोहळ्यामध्ये मध्ये प्रदान करण्यात आला.

यावेळी सिनेअभिनेत्री व बाळूमामा टिव्हीमालिकेची  प्रसिद्ध कलाकार सिद्धी कामथ,एकपात्री कलाकार प्रा.शुभांगी शिंदे,दिग्दर्शक कलाकार महेश्वर तेटांबे, उद्योजीका नम्रता गुरव ,समाजसेविका प्रा.शुभांगी भालेराव,जेष्ठ पत्रकार  राहुल खरात,प्राचार्य संजय खरात प्रामुख्याने उपस्थित होते.

रघुनाथ ढोक हे अनेक वर्षांपासून पुणे सातारा परिसरात सातत्याने सामाजिक कार्य करीत असून विधवा, विधुर,घटस्फोटीताचा पुनर्विवाह  होणे कामी मोफत सर्व धर्मीय मेळावे नेहमी घेत असतात. त्यांनी जातीय, आंतरजातीय, अंतरराज्यीय,  आंतरराष्ट्रीय व मंत्र्याच्या घरातील पहिले सत्यशोधक विवाह महनीय मान्यवरांच्या उपस्थितीत लावून या विवाहास  प्रतिष्ठा,मानमरातब  मिळवून दिली आहे त्यामुळे त्यांचे हातून अल्पशिक्षित ते उच्चशिक्षित व नुकतेच ब्राह्मण मुलाचा देखील सत्यशोधक विवाह लावला आहे. ते सत्यशोधक पद्धतीने  गृहप्रवेश, महापुरुषांचे पुतळा अनावरण पूजा  अनेक प्रथम स्मृतिदिनाचे कार्यक्रम पार पाडीत असून   फुले शाहु आंबेडकर यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर जाऊन करीत आहेत. सर्व समाजाने अंधश्रद्धा, कर्मकांड ,महूर्त, पंचांग यातून बाहेर पडून  सत्यशोधक पद्धतीने  विवाह करून लोकांनी आर्थिक उधळपट्टी न करिता तो खर्च स्वतःचे संसारात उपयोगी आणावा म्हणून सातारा मधील वावरहिरे या गावी (छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालून सत्यशोधक विवाह होतो) आणि पुणे येथे वडगांव बु.ला (महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सत्यशोधक विवाह होतो )मोफत  बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र  सर्व आधुनिक सोयी सुविधांसह निर्माण केलेले आहे.या माध्यमातून ते विवाहाची रजिस्टर नोंदणी करून  वधु वर यांना संस्थेचे वतीने सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटोप्रेम भेट देत असतात. हे कार्य वर्षातील 365 दिवस घडू शकते त्यामुळे त्यांनी लावलेल्या विवाहास एक चांगली सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळत आहे त्यामुळे त्यांचे हातून गेली अडीच वर्षात 25 सत्यशोधक विवाह लावून झालेले आहेत.त्यांची एकच ईच्या बाकी आहे की सामुदायिक सत्यशोधक विवाह झाले पाहिजेत पण सध्या कोव्हिडंचे  थैमान चालू असल्याने ते गप्प आहेत.त्यांचे या कार्यात पत्नी सौ.आशा आणि त्यांची दोन मुले आकाश,क्षितिज व सुदाम धाडगे,हनुमंत टिळेकर जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा,सुरेश भोंगळे,रमेश जाधव नेहमी हिरीरीने साथ देतात म्हणूनच हे विधायक कार्य घडत आहे. त्यांनी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जीवनचरित्र मराठी, हिंदी,इंग्रजी , जर्मन भाषेत व दीनांची साऊली ,ऐतिहासिक शूरमहिला, तुकारामनिती, ज्ञानेश्वरनिती, विध्येची अधिष्ठात्री सावित्रीबाई फुले हे पुस्तके प्रकाशित केले असून लवकरच महात्मा फुले गीत चरित्र महात्मा फुले जयंती निमित्ताने प्रकाशित करणार आहेत.त्यांना सर्वांनी त्यांचे पुस्तके खरेदी करून त्यांचे विधायक कार्याला थोडी तरी मदत करावी अशी माफक अपेक्षा आहे.त्यांच्या या आदर्श सेवेची दखल मित्र परिवार ,पत्रकार बंधु नेहमी घेत असतात म्हणूनच त्यांचे कार्य बहरत चालले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News