बाल न्याय कायद्यावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.. अल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात कायदेशीर तरतुदींचे मार्गदर्शन


बाल न्याय कायद्यावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.. अल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात कायदेशीर तरतुदींचे मार्गदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रज्ञा हेन्द्रे-जोशी यांनी लिहिलेल्या "विधिसंघर्षग्रस्त बालके आणि बाल न्याय कायदा" या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, उपअधीक्षक (गृह शाखा) प्रांजल सोनावणे यांनीही या प्रकाशन सोहळ्यात भाग घेतला.                              अल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात नेमक्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, अल्पवयीन मुलांसाठी न्यायदान पद्धती कशा प्रकारची असते, याविषयी महत्वपूर्ण माहिती ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी यांच्या या पुस्तकातून मिळण्यास मदत होईल. बाल न्याय मंडळावर महिला बाल विकास विभागाकडून नियुक्त केले जाणारे समाजसेवक सदस्य, वकील, न्यायाधीश, बाल हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते तसेच या विषयावर कुतूहल असणारे सर्वसामान्य नागरिक या सर्वांना या पुस्तकामुळे सोप्या शब्दात नेमके मार्गदर्शन मिळेल, असा विश्‍वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी "बाल न्याय कायदा व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्याचे नियम" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात  ॲड. प्रज्ञा हेन्द्रे- जोशी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्या ॲड. बागेश्री जरंडीकर, बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, चाईल्डलाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भीक मागणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रज्ञा हेन्द्रे-जोशी यांनी लिहिलेल्या "विधिसंघर्षग्रस्त बालके आणि बाल न्याय कायदा" या पुस्तकाचे प्रकाशन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. समवेत (डावीकडून) जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बालकल्याण समिती सदस्य प्रवीण मुत्याल, बालकल्याण समिती अध्यक्ष हनीफ शेख, पोलीस निरीक्षक कांबळे, उपअधीक्षक (गृह शाखा) प्रांजल सोनवणे, श्री. पाटील, अतिरिक्त अधीक्षक सौरभ आगरवाल, लेखिका ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी, चाईल़्डलाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी, बालकल्याण समिती सदस्या ॲड. बागेश्री जरंडीकर, निरीक्षक मसूद खान. छाया उदय जोशी 


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News