केडगाव येथे 40 बेड ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन, रुबी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरां ची होणार व्हिजिट


केडगाव येथे 40 बेड ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन, रुबी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरां ची होणार व्हिजिट

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

केडगाव येथे आयसीयू व मोहिते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 40 बेड ऑक्सिजन असलेल्या कोविड सेंटर चे भव्य उद्घाटन माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी रमेश थोरात म्हणाले की कोरोनाचे पेशंट वाढत आहेत त्या दृष्टीने असे कोविड सेंटर होणे गरजेचे होते,डॉक्टर दाम्पत्यास त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,त्या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड तालुका पंचायत समिती सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, पाराजी हंडाळ,संभाजी ताकवणे, सागर फडके, लक्ष्मण दिवेकर, संतोष शिलोत, सुहास रुपनवर, संतोष शेळके, नारायण गुळमे, सुहास रुपनवर, अनिल शितोळे, ज्योती शेळके, विश्वासराव भोसले, विशाल शेलार, भानुदास नेवसे, डॉ श्रीवल्लभ अवचट, सचिन शेळके, आरोग्य अधिकारी डॉ पोळ,पद्माकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. वंदना दिनेश मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी डॉ दिनेश मोहिते यांनी सांगितले की या कोविड सेंटरला रुबी हॉस्पिटल मधील आई सी यु तज्ञ एमडी  डॉक्टरांच्या टीमचा रोज प्रत्येक पेशंटला दिवसातून तीन वेळा राऊंड घेऊन स्वतः डॉक्टर चेक अप करणार आहेत त्याबरोबर लॅब चे सर्व तपासणी व मेडिकल सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील.यासाठी डॉ  मोहिते दाम्पत्यांनी संपर्कासाठी स्वतः चा नंबर दिला आहे,डॉ दिनेश साहेबराव मोहिते :7038346623

डॉ.वंदना दिनेश मोहिते: 9860037126

Landline: 02119223333 या नंबरवर संपर्क करण्याचे डॉ वंदना मोहिते यांनी आवाहन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News