शिरूरच्या त्या ट्रक प्रकरणाची जबाबदारी कोणाची ..? ख-या सुत्रधारावर कारवाई होणार का..? नागरिकांमधुन होतेय मागणी


शिरूरच्या त्या ट्रक प्रकरणाची जबाबदारी कोणाची ..?  ख-या सुत्रधारावर कारवाई होणार का..?  नागरिकांमधुन होतेय मागणी

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

शिरूर तहसिल कार्यालयाच्या ताब्यातील कारवाईतील त्या प्रकरणामागील ख-या सुत्रधारांची अद्यापोट चाैकशी करून कारवाई केली जात नसल्याने वरीष्ठांकडुन अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे.

          शिरूर तहसिल कार्यालयाच्या आवारात व त्यांच्या कायदेशीर रखवालीतील ट्रक दि.२० रोजी सहा जणांनी बाहेर काढुन त्यातील वाळु कमी करून सदर ट्रक पुन्हा आवारात आणुन लावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला असुन याबाबत गुन्हा दाखल झाला.परंतु सदर ट्रक तहसिल कार्यालयाच्या अधिका-यांच्या कायदेशीर ताब्यात असताना हा ट्रक बाहेर नेण्याचे धाडस या सहा जणांनमध्ये कसे आले.या प्रकाराची जबाबदारी कोणावर निश्चित होत नाही का ? असा प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित केला जात असुन प्रकारामागील खरा सुत्रधार चाैकशी करून शोधुन काढण्याची मागणी जोर धरत आहे.

              या पुर्वीही कारवाईतील ट्रक तळेगावच्या गोडाऊनमधुन पळवुन नेण्याचा प्रकार घडला होता.दरम्यान तळेगावच्या या घटनेत कनिष्ठ कर्मचा-यास जबाबदार धरून चाैकशी व कारवाईचे अधिकार काढुन घेण्याबाबतचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले असल्याची माहिती समजत असुन शिरूर तहसिलमधील त्या ट्रकबाबतच्या घटनेची गांभीर्याने दखल घऊन जबाबदारी निश्चित करून ख-या सुत्रधाराची चाैकशी करून दुजाभाव न करता दोषींवर वरिष्ठ पातळीवरून कारवाई करण्याची मागणी  नागरिकांमधुन होत आहे.

शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळु उपसा होत असल्याचे यावरून सिध्द होत असुन कारवाईसाठी पथक निघाले कि एका दलालाकडुन वाळु माफियांना याची माहिती आधीच समजत असल्याने ट्रक,जेसीबी,ट्रॅक्टर हे माफीया पळवुन घेऊन जात असल्याचे प्रकार घडत असुन फक्त फोटो सेशन करून कारवाईचा फार्स केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधुन केला जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News