पुणे विभागातील 6 लाख 41 हजार 255 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी... विभागात कोरोना बाधित 7 लाख 16 हजार 199 रुग्ण


पुणे विभागातील 6 लाख 41 हजार 255 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...  विभागात कोरोना बाधित 7 लाख 16 हजार 199 रुग्ण

भालचंद्र महाडिक बारामती प्रतिनिधी :

        पुणे, दि. 26 :- पुणे विभागातील 6 लाख 41 हजार 255 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 16 हजार 199 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 971 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 973 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.54 टक्के आहे.


पुणे जिल्हा


            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 4 लाख 92 हजार 694 रुग्णांपैकी 4 लाख 33 हजार 429 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 49 हजार 633 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 632 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  1.95 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  87.97 टक्के आहे.


सातारा जिल्हा


              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 63 हजार 248 रुग्णांपैकी 58 हजार 830 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 535 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा


              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  58  हजार 307 रुग्णांपैकी 52 हजार 673 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 719 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 915  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50  हजार 393 रुग्णांपैकी 47 हजार 174 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 439 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  51 हजार 557 रुग्णांपैकी 49  हजार 149 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  645 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 7 हजार 642 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 6 हजार 432, सातारा जिल्ह्यात 371, सोलापूर जिल्ह्यात 516, सांगली जिल्ह्यात  231 तर  कोल्हापूर जिल्ह्यात 92 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ  झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या  रुग्णांमध्ये  एकूण  3 हजार 191 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 808, सातारा जिल्हयामध्ये 185, सोलापूर जिल्हयामध्ये 151, सांगली जिल्हयामध्ये 13 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 34 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 46 लाख 73 हजार 210 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  7 लाख  16  हजार 199 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 25 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News