शेवटच्या लाभधारक शेतकऱ्याला पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, त्याचबरोबर त्यांना सहकार्य लाभधारक शेतकऱ्यांनी करावे – आमदार बबनराव पाचपुते.


शेवटच्या लाभधारक शेतकऱ्याला पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, त्याचबरोबर त्यांना सहकार्य लाभधारक शेतकऱ्यांनी करावे – आमदार बबनराव पाचपुते.

श्रीगोंदा प्रतिनिधी: अंकुश तुपे- घोडचे उन्हाळी दोन आवर्तने 27 मार्च व 10 मे 2021 रोजी सोडण्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. परंतु लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांचेकडील थकित पाणीपट्टी काही प्रमाणात जमा केल्याशिवाय वितरिका सोडल्या जाणार नाही असा फतवा जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे थकबाकी वसुली बाबत व उन्हाळी आवर्तनाचे योग्य नियोजन करणेसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी विविध कार्यकारी सोसायटी च्या मध्ये जलसंपदा खात्याचे अधिकारी व पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी यांची संयुक्त मिटिंग बैठक आयोजित केली, यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणाले की पाणी प्रत्येकाला मिळाले पाहिजे हा जसा प्रत्येक लाभधारकास हक्क आहे तसेच पाणीपट्टी आपण वेळेवर भरली पाहिजे याचा मात्र सोयीस्कर विसर होतो. हे आता इथून पुढे चालणार नाही याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणूनच पाणीपट्टी न भरणाऱ्यांना पाणी नाही हा फतवा जलसंपदा खात्याने काढला आहे.


 सर्व थकित पाणीपट्टी एकत्र भरणे शक्य नसल्यामुळे त्यामध्ये काही तरी मार्ग काढा अशी मागणी चर्चेअंती पुढे आल्यानंतर येणाऱ्या दोन्ही आवरतणासाठी सरसकट एकरी पाचशे रुपये प्रमाणे पाणीपट्टी जलसंपदाच्या कार्यालयाकडे  किंवा पाणी वापर संस्थेकडे जमा करावी असा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला. त्यास जलसंपदा अधिकाऱ्यांनी हि मान्यता दिली. यापुढे  पाणी मागणी फॉर्मद्वारे मागणी केल्याशिवाय कोणालाही पाणी मिळणार नाही याची सर्वांनी जाणीव करून द्यावी पैसे भरल्यानंतर त्वरित पावती देणे नदीमध्ये बंधाऱ्यासाठी पाणी सोडणे असे महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले.  या सभेचे प्रास्ताविक काष्टी शाखा अभियंता- श्री. दिलीप डफळ यांनी केले. त्याचप्रमाणे  ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, एडवोकेट विठ्ठलराव काकडे, सुनील जंगले अनिलमामा पाचपुते, संदीप महाराज पाचपुते, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नागवडे, तुकाराम शिपलकर, भास्कर जगताप, डॉक्टर डी. एस. नागवडे आदींनी चर्चेमध्ये भाग घेऊन आपले मत मांडले.आभार  जलसंपदा विभागाचे पंदरकर रावसाहेब यांनी मांडले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News