प्रभाग क्रमांक 12मधील भिस्तगल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ


प्रभाग क्रमांक 12मधील भिस्तगल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

नगरसेवकांची ओळख त्यांच्या कामातून होत असते - आसाराम कावरे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) प्रभागातील नागरिकांना मुलभुत सुविधा देणे हे नगरसेवकाचे प्रथम कर्तव्य आहे. रस्ते, वीज, पाणी ही दैनंदिन जीवनातील महत्वाच्या गोष्ट असल्याने त्या पुरविणे आवश्यक आहे. गल्ली,कॉलनीतील नागरिकांना या सुविधा मिळाल्यास शहराच्या विकासात भर पडत असते. छोट-छोट्या कामातून प्रभागाचा विकास होतो अन् पर्यायाने शहराच्या विकासास चालना मिळत असते. नगरसेवकांनी या भागाकडे विशेष लक्ष देऊन सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विकास कामे करतांना नागरिकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन त्या सोडविल्या पाहिजे. प्रभागाच्या विकासाबाबत नगरसेवकांचे सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामातून त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक आसाराम कावरे यांनी केले.प्रभाग क्रमांक 12, बंगाल चौकीजवळील, भिस्तगल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक राशदभाभी कलोसिया यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक आसाराम कावरे, रजनी वाघमारे, समीना गफुर शेख, पत्रकार सय्यद वहाब, ऋषीकेश कावरे, मतीन शेख, फारुक बागवान, अय्युब खान, गणेश चव्हाण, सय्यद शफीभाई, सादिक जमालखान, गफुरभाई बर्फवाले, राजू चव्हाण, शेख निसार इब्राहीम आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी सय्यद वहाब म्हणाले, प्रभागातील नागरिकांनी आपल्या भागातील प्रश्‍नांबाबत जागृत राहिले पाहिजे,  त्या नगरसेवकांपर्यंत पोहचविल्यास त्या सोडविण्याची त्यांची जबाबदारी आहे. या भागातील नगरसेवक आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबतचा पुढाकार कौतुकास्पद आहे.  नागरिकांनीही सुरु असलेल्या दर्जेदार होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. यापुढेही अशीच कामे होत रहावीत, अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी महिलांनी मनोगत व्यक्त करुन या भागातील प्रश्‍न मांडले. शेवटी ऋषीकेश कावरे यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News