42 किलो गांजा सह ट्रक जप्त एक आरोपी जेरबंद अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग कारवाई


42 किलो गांजा सह ट्रक जप्त एक आरोपी जेरबंद अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की यवतमाळ ते देवगाव रोडवर पद्धतीने अमली पदार्थांची वाहतूक होत आहे त्यानुसार या रोडवर नाकाबंदी करण्यात आले त्यावेळी मुद्देमाल जप्त करण्यात आला, अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे आणि त्यांचे पथक व तळेगाव दशासर पोलिसांनी संयुक्तरित्या तमाळ देवगाव रोडवर नाकाबंदी केली आणि येणार्‍या-जाणार्‍या सर्वांची चेकिंग करत असताना  ट्रक क्रमांक एम एच 31 ए पी 2729 याची झाडाझडती घेत असता संदिग्धरीत्या बसलेले आढळले पोलिसांची चाहूल लागताच यातील एक आरोपी फरार झाला तर दुसरा आरोपी सनाउल्ला खा आताऊल्ला खा वय 25 राहणार रहमत नगर अमरावती याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून 42 किलोग्राम जप्त केला आहे त्याची किंमत मार्केटमध्ये 6,28,140 रुपये होते गुन्ह्यात वापरलेली ट्रक ची अंदाजे किंमत नऊ लाख असा एकूण पंधरा लाख अठावीस हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ही कारवाई अमरावती पोलीस अधीक्षक हरी बालाजी, उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपण कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी आणि स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीचे सर्व पोलिस पथक या सर्वांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News