कुरकुंभ एमआयडीसीत आगीचे प्रमाण वाढलेले : सम्राट पेपर कंपनीत भीषण आग ; तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात


कुरकुंभ एमआयडीसीत आगीचे प्रमाण वाढलेले : सम्राट पेपर कंपनीत भीषण आग ; तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

 कुरकुंभ औद्योगीक वसाहतीत कंपन्यांना आग लागण्याचे सत्र सुरूच आहे.  गुरूवारी ( दि.२५ ) रोजी पहाट ४:३० वाजण्याच्या सुमारास सम्राट (गोदावरी ) पेपर मिल कंपनीच्या पेपरच्या पृष्ठास आग लागल्याची घटना घडली. तब्बल चार तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीत कंपनीतील लाखो रूपयांचे पेपर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, या आगीचे नेमके कारण समजू शकले नसून जीवीत हानी झाली नाही. अशी माहिती कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस  दत्तात्रय चांदणे यांनी दिली.

मागील काही दिवसापुर्वी कुरकुंभ औद्यागीक वसाहती मधील अनेक कंपन्यांमध्ये स्फोटकाचे  प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे.

हि आग लागल्याची घटना ताजी आहे. आज पुन्हा एकदा कुरकुंभ औद्यागीक वसाहतीमधील सम्राट पेपर कंपनीतील पेपरच्या पुष्ठाला भीषण आग लागली. पेपर असल्याने आग काही क्षणात कंपनीच्या परिसरात पसरत गेली. आगीचे डोंब आणि धुराचे लोट आकाशात पसरले. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेनशचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने कुरकुंभ पोलीस चौकीचे  हवालदार  ए.एम.शिंदे,एम.बी.हिरवे ,दत्तात्रय

चांदणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कुरकुंभ औद्योगीक वसाहतीमधील दोन आग्णीशामक बंब आणि दौंड नगर पालिकेच्या आग्णिशामक बंबास पाचारण करण्यात आले.

कंपनीत लवकर पेट घेणारे पेपर आणि साहित्य असल्याने आगीने स्फोटकरूप धारण केले होते. आग्णिशामक दलाच्या जवानांनी पहाटे साडे चार वाजता लागलेली आग ही सकाळी  ४ तासानंतर आटोक्यात आली. तब्बल चार तासाचा कालवधी हा आग विझविण्यासाठी गेला.चार तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र या आगीत जीवीत हानी टळली असली तरी कंपनीतील साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News