केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी सीबीएसई शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आणि एनसीईआरटीने निवडलेल्या 100 हून अधिक अभ्यासक्रम आधारित कॉमिक पुस्तकांचे प्रकाशन 24 मार्च 2021 रोजी केले. दीक्षा वेब पोर्टलवर (diksha.gov.in) किंवा कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनवरील दीक्षा अॅप द्वारे ही कॉमिक्स वाचता येतील. नवीन व्हाट्सॲप समर्थित चॅट बोट द्वारे देखील कॉमिक्स बघता येतील. चॅटबोट डिजिटल शिक्षणाची व्याप्ती वाढविण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो. सीबीएसई क्षमता आधारित शिक्षण प्रकल्पाचा एक भाग म्हणून विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांसाठी सीबीएसई मूल्यांकन रचना देखील यावेळी मंत्री महोदयांनी सुरू केली.
यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कल्पनाबद्ध दृष्टिकोनातून सुरू करण्यासाठी एनसीईआरटीच्या तिसरी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ कॉमिक पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पाठ्यपुस्तक शिकण्यापलीकडे संकल्पना समजून घेण्यासाठी आणि वास्तविक जगाशी / दररोजच्या उपक्रमांशी संबंध जोडण्याच्या बदलांची कल्पना आहे. हे यांत्रिकी शिक्षणापेक्षा सर्व सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना आणखी गती देते. म्हणूनच, या संदर्भात, एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांच्या तिसरी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकातील धड्या नुसार कॉमिक पुस्तके नवीन शैक्षणिक स्त्रोत म्हणून विकसित केली गेली आहेत.