ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिनंदन


ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिनंदन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

असामान्य प्रतिभेच्या जेष्ठ गायिका ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहिनी घातली   अश्या ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन-छगन भुजबळ.

आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहिनी घालणाऱ्या ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आशाताई भोसले यांच्या अभिनंदन केले आहे.... 

यावेळी श्री भुजबळ म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय हे सर्वार्थाने महाराष्ट्राला लाभलेले रत्न आहेत. मंगेशकर कुटुंबातील महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळवणाऱ्या आशाताई ह्या दुसऱ्या व्यक्ती ठरल्या आहेत. आज मंगेशकर कुटुंबातील आणखी एका रत्नाचा यथोचित सन्मान महाविकास आघाडी सरकारने केल्यामुळे अतिशय आनंद झाल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत...

आशाताईंच्या अभिनंदन करतानाच श्री भुजबळ म्हणाले की आशाताईंनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजाने त्या अनेक वर्ष संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या गायनाचा यथोचित गौरवच आहे....

जाहिरात
Search
विडिओ
Recent News