शिरूर शहरास पिण्याच्या पाण्याचा तत्काळ चांगला व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार


शिरूर शहरास पिण्याच्या पाण्याचा तत्काळ चांगला व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने नगरपरिषदेस निवेदन देवुन देण्यात आला इशारा

शिरूर प्रतिनिधी - गजानन गावडे

शिरुर नगरपरिषदेच्यावतीने शहरास पिण्याच्या पाण्याचा तत्काळ चांगला व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा ताव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदन देवुन देण्यात आला असल्याची माहिती युवा मोर्चाचे शहराध्यक्ष उमेश शेळके यांनी दिली

 भाजपा युवा मोर्चाच्यावतीने शिरूर नगरपरिषदेस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरात गेल्या काही दिवसांपासुन दुर्गंधीयुक्त पिवळसर खराब पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.या पाण्यामुळे शहरातील नागरिकांना डायरीया,जुलाब, उलट्या यांसारखे गंभीर आजार होण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी २३०० रूपये घेऊन सुध्दा शिरुर नगर परिषद शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक पाणीपुरवठा करुन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे असे निदर्शनास येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.             

पाणी पुरवठा योजनेची पहाणी करुन सुशिक्षीत व प्रशिक्षीत कर्मचारी ठेऊन पाणी पिण्यायोग्य व्हावे यासाठी योग्य उपाययोजना करून जनतेच्या जीवाशी खेळ बंद करावा व त्यांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ चांगला पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा असा दिलेल्या निवेदनातुन इशारा देण्यात आला. 

        यावेळी भाजपा सरचिटणीस विजय नरके,युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके, कौस्तुभ उबाळे,सुयोग मंडले, राहिल शेख आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News