एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील 3,479 रिक्त पदे भरण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने अर्ज मागविले


एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील 3,479 रिक्त पदे भरण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने अर्ज मागविले

Maharashtrabhumi News Network 25.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने स्वतःच्या अखत्यारीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशातील 17 राज्यांमध्ये असलेल्या ईआरएमएस अर्थात एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील शिक्षकांची 3,479 रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज मागविले आहेत. अर्ज प्रक्रिया येत्या 1 एप्रिल पासून सुरु होईल.या भर्तीमुळे एकलव्य निवासी शाळांमध्ये उच्च दर्जाचे मनुष्यबळ कार्यान्वित होईल आणि त्याचा परिणाम म्हणून या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होईल. प्राचार्य, उप-प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक या पदांसाठी ही भर्ती होणार असून केंद्रीकृत संगणकाधारित चाचणी आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखती (प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक वगळून) यांमधील पात्रतेनुसार या नेमणुका होणार आहेत. राज्य-विशिष्ट रिक्त पदांच्या संख्येनुसार देशातील 17 राज्यांमध्ये होणाऱ्या भर्तीचे तपशील खालील तक्त्यात दिले आहेत.

 

SL No.

State/UT

Principal

Vice Principal

Post Graduate Teacher

Trained Graduate Teacher

Total Vacant Position

1

Andhra Pradesh

14

6

0

97

117

2

Chhattisgarh

37

19

135

323

514

3

Gujarat

17

2

24

118

161

4

Himachal Pradesh

1

0

6

1

8

5

Jharkhand

8

8

132

60

208

6

Jammu & Kashmir

2

0

0

12

14

7

Madhya Pradesh

32

32

625

590

1279

8

Maharashtra

16

8

28

164

216

9

Manipur

0

2

8

30

40

10

Mizoram

0

3

2

5

10

11

Odisha

15

11

12

106

144

12

Rajasthan

16

11

102

187

316

13

Sikkim

2

2

17

23

44

14

Telangana

11

6

77

168

262

15

Tripura

1

3

36

18

58

16

Uttar Pradesh

2

2

37

38

79

17

Uttarakhand

1

1

3

4

9

Total

175

116

1244

1944

3479

 

नियमित आणि तात्कालिक किंवा कंत्राटी तत्वावर सध्या भरण्यात आलेल्या पदांखेरीज इतर पदांची मोजणी करून सध्या कार्यरत असलेल्या तसेच या वर्षी सुरु होणाऱ्या एकलव्य शाळांमधील निश्चित रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांसोबत संयुक्तपणे ही भर्ती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या तात्कालिक किंवा कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक वर्गाबाबत विविध संबंधितांशी सल्लामसलत करून पुढील कार्यपद्धती ठरविण्यात येईल.

अर्ज भरण्यासाठीचे पोर्टल 1 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत खुले असेल. या पदांसाठीची परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असा निर्णय सध्या तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. या पोर्टलची अधिक माहिती आणि अंतिम तारखांसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्या: https://nta.ac.in and https://tribal.nic.in 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News