केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी डिजिटल सोल्युशन्सचा लाभ घेण्यासाठी केंद्रीय छाननी केंद्र आणि आयईपीएफएचे मोबाइल ॲप सुरू केले


केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारमण यांनी डिजिटल सोल्युशन्सचा लाभ घेण्यासाठी केंद्रीय छाननी केंद्र आणि आयईपीएफएचे मोबाइल ॲप  सुरू केले

न्यूज नेटवर्क(ता.25)

केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय छाननी केंद्र (सीएससी) आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाचे  (आयईपीएफए) मोबाइल ॲप या कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या दोन तंत्रज्ञान -सक्षम उपक्रमांचा  व्हर्चुअल शुभारंभ केला.अर्थमंत्री म्हणाल्या की कंपनी व्यवहार मंत्रालयाचा  समाज, कॉर्पोरेट्स, अर्थव्यवस्था आणि व्यावसायिकांच्या हितासाठी डिजिटायझेशन , ऑटोमेशन आणि सुधारणांचा निरंतर प्रवास सुरु  आहे.

सीतारमण पुढे म्हणाल्या की, एमसीएने गेल्या दोन वर्षांत भारतामध्ये व्यवसाय सुलभतेला (ईओडीबी) चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. कोविड -19 काळातही भारतात नवीन कंपन्याच्या  संख्येत झालेली वाढ ही नवीन कंपन्यांसाठी  एसपीआयसीई  + आणि अजाईल प्रो  यासारख्या पुढाकारांचा परिणाम आहे . यामुळे देशात व्यवसाय उभारणीसाठी इच्छुक प्रवर्तकांना एक थांबा उपाय उपलब्ध करून दिला आहे.

यावर्षी फेब्रुवारी  2021 पर्यंत केंद्रीय नोंदणी केंद्राकडे 1.38 लाख कंपन्यांनी नोंदणी केली. गेल्या वर्षी याच कालावधीत  सुमारे 1.16 लाख कंपन्यांनी नोंदणी केली होती असे सीतारामन यांनी नमूद केले.

अर्थमंत्री म्हणाल्या की, केंद्रीय छाननी केंद्र, एमसीए 21 रजिस्ट्रीवर कंपन्यांनी दाखल केलेल्या स्ट्रेट थ्रू प्रोसेस (एसटीपी) फॉर्मची छाननी करेल आणि अधिक सखोल छाननीसाठी कंपन्यांना लक्ष्य करेल.अर्थमंत्र्यांनी आयईपीएफए मोबाइल ॲप देखील सुरू केले. यावेळी  अर्थमंत्री म्हणाल्या , “मोबाइल अ‍ॅपचे उद्दिष्ट  आर्थिक साक्षरतेचे उद्दिष्ट  साध्य करणे, गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे , शिक्षण आणि  संरक्षण पुरवणे हे  आहे. जीवन सुलभता हे आमचे मुख्य ध्येय आहे. ” सीतारमण म्हणाल्या की,  गुंतवणूकदारांमध्ये  जागरूकता वाढवण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि माहिती प्रसारासाठी हे मोबाईल ॲप   विकसित केले आहे.  ग्रामीण आणि शहरी भागातील गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता, गुंतवणूकदारांमध्ये  जागरूकता, शिक्षण आणि संरक्षणाचे उद्दीष्ट साध्य करणे हा या ॲप चा उद्देश आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News